Operation Tiger UBT Shivsena Nagesh Ashtikar Patil: नागेश आष्टीकरांचा मुलगा सुषमा अंधारेंवर संतापला, म्हणाला, ‘तुमच्यासारख्या नेत्यांचा वीट…’


Operation Tiger UBT Shivsena Nagesh Ashtikar Patil: उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेले हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यावर सध्या ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. नागेश आष्टीकर यांच्या मुलाला उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची उमेदवारीही दिली होती. तरीही नागेश पाटील आष्टीकर यांनीही निष्ठा बदलल्याने ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. या टीकेला नागेश आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा आष्टीकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

सुषमा अंधारे यांच्या आरोपांना उत्तर द्यायला मी बांधील नाही. सुषमा अंधारे यांनी तर पार आमच्या खानदानीचा उद्धार केला, हे ऐकून मला खूप वाईट वाटले. वडील एका पक्षात आणि पुत्र दुसऱ्या पक्षात, हे समीकरण काही नवीन नाही. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गजानन कीर्तिकर आहे तर अमोल कीर्तीकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. अजून माझे वडील तिकडे गेलेत का, यांना कसली घाई आहे हेच मला कळत नाहीये. सुषमा अंधारे पुण्यात बसून गणित मांडत आहेत. अशा नेत्यांमुळेच त्यांना वीट आला असावा. आमच्यावर व्यक्त होण्याचं काही कारण नव्हते, असे कृष्णा पाटील आष्टीकरांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितले.

मी उद्धव ठाकरेंचा माणूस आहे आणि मी सर्व प्रश्नांची उत्तरे फक्त उद्धव ठाकरे यांना देत आहे. सुषमा अंधारे यांना उत्तर द्यायला मी काही बांधील नाही. मी  उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्कात होतो, मिलिंद नार्वेकर यांना मी सगळ्या घटना आणि घडामोडी सांगितल्या आहेत. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा फोन ज्या दिवसापासून बंद आहेय त्या दिवसापासून माझं आणि त्यांचं बोलणं झालेले नाही. नांदेडमध्ये शिवसैनिकांनी आज पुतळा जाळला, यात ते थोडी घाई करत आहेत, मी बंड केलेले नाही, मी अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे, असे कृष्णा आष्टीकर यांनी म्हटले.

Shivsena News: नागेश पाटील आष्टीकर यांनी माघारी परत यावे; जिल्हाप्रमुख गोपू पाटील यांची प्रतिक्रिया

ऑपरेशन टायगरमध्ये हिंगोली चे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे सहभागी झाले असून ते मागील दोन दिवसापासून नॉट रिचेबल आहेत. 
नागेश पाटील आष्टीकर यांनी गट स्थापन केला असून लवकरच ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर नागेश पाटील आष्टीकर यांचे निकटवर्तीय असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपू पाटील यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला असता नागेश पाटील आष्टीकर यांनी माघारी परत यावे. मागील दोन दिवसापासून त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करतोय. परंतु त्यांचा फोन लागत नाही.  काल शिवसेनेच्यावतीने नागेश पाटील आष्टीकर यांना व्हिप बजावला होता, आम्हाला अपेक्षा होती की नागेश पाटील आष्टीकर काल दिल्लीमध्ये झालेल्या संसदीय बैठकीला उपस्थित राहतील. परंतु तिथेसुद्धा आष्टीकर आले नाहीत. त्यामुळे आष्टीकर साहेबांना जर पक्ष बदलायचा असेल तर त्यांचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख गोपू पाटील यांनी दिली आहे.  

Thackeray Camp MPs: शिवसेनेच्या वर्धापनदिन सोहळ्यात सहा खासदार पक्षप्रवेश करणार नाहीत

आज मुंबईतील गोरेगावमध्ये नेस्को येथे शिवसेनेच्या वर्धापनदिन सोहळ्यात सहा खासदार पक्षप्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. परंतु त्यात कोणतेही तथ्य नाही. असा कोणताही पक्षप्रवेश 19 तारखेला होणार नाही. जे होईल ते 20 तारखेनंतर होईल, अशी माहिती शिंदे गटातील वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आली आहे. 

आणखी वाचा

Maharashtra Politics : संजय राऊतांची ‘ऑपरेशन तुडवा’ची धमकी, बंडखोर खासदारांना Y प्लस सुरक्षा, गृह विभागाचा तातडीचा आदेश



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *