Best Strike: मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन समजली जाणारी बेस्ट सेवा काल (18 जून) मध्यरात्री 12 वाजेपासून ठप्प झाली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी बेस्ट कृती समितीकडून संपाची (BEST employees strike) हाक देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईची जीवनवाहिनीवर त्याचा परिणाम होणार असून या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. एकीकडे कोर्टाच्या बंदीनंतरही बेस्टचे 23 हजार कर्मचारी संपावर गेल्याने मुंबईकरांचे काहीसे हाल होतांनाचे चित्र आहे.
दरम्यान, आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्ट कृती समितीने पुकारलेल्या संपामुळे बेस्ट सेवा पुरती विस्कळीत झाली आहे. एकीकडे शशांक राव आणि प्रसाद लाड यांच्या संघटनांनी संप मागे घेण्याच आवाहन केलं असल तरी मोठ्या संख्येने कर्मचारी संपात सहभागी झाले झाल्याने बेस्ट सेवा जवळजवळ ठप्प झाली आहे. तर याचा फटका मुंबईकरांना बसला आहे. बस थांब्यांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत असून संपाची पूर्व कल्पना नसलेल्या मुंबईकरांना ऐन सकाळी मनस्ताप सहन करावा लागतोय. या संपावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी मुंबईकरांनी केली आहे. (BEST Strike Update)
BEST employees strike : संप करण्यास तात्पुरती मनाई, कोर्टाच्या बंदीनंतरही बेस्टचे 23 हजार कर्मचारी संपावर
मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमातल्या कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. औद्योगिक न्यायालयानं काल (18 जून) संध्याकाळीच बेस्टच्या बाजूनं अंतरिम आदेश दिला होता. या प्रकरणात बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीशी संबंधित युनियनचे कर्मचारी आणि वेट लीज ऑपरेटर यांना 18 जूनच्या मध्यरात्रीपासून संप करण्यास तात्पुरती मनाई केली होती. पण त्यानंतरही बेस्टच्या वाहतूक विभागातील चालक-वाहक आणि वीज विभागातील कर्मचारीही या संपात सहभागी होणार आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. पण शशांक राव आणि प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखालील बेस्ट कर्मचाऱ्यांची युनियन या आंदोलनामध्ये सहभागी नसल्याची माहिती आहे. वाहतूक आणि वीजपुरवठा सुरळीत राहिल असा दावा प्रसाद लाड यांनी केलाय.
बेस्ट कृती समितीचं म्हणणं काय? (BEST Strike Update)
या संपावर बेस्ट कृती समितीकडून म्हंटल जात आहे की, आम्ही संपाची हाक दिली आहे. कोर्टाने म्हंटले आहे कि, संप नका करू. पण कोर्टाने प्रशासनाला आमच्यासोबत चर्चा करून तोडगा काढायला सांगितला आहे. कामगारांचे बेस्टमध्ये विलीनीकरण करून वेटलीजचा मनमानी कारभार थांबेल. कोर्टाची ऑर्डर बघाता हा संप घेता येणार नाही असं सांगण्यात आलं आहे. याचा आम्ही आदर करतो. पण असे ही म्हंटले आहे की सरकारने समिती सोबत चर्चा करावी आणि निर्णय घ्यायला हवा. कोर्टाची दिशाभूल केली जात आहे आम्ही दरवाजे चर्चेसाठी खुले ठेवले आहे. असे मत बेस्ट कृती समिती आणि संपातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
वेटलीजचे जे कंट्राटी कामगार आहे त्याना बेस्टमध्ये घ्यायला हवे. त्यांचे ग्रॅज्युटी मुलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजे. बेस्ट समिती सदस्य म्हणून निवेदन ही वारंवार दिले आहे. आम्ही म्हंटले आहे योग्य तोडगा काढा. मुंबईला वेटीस धरून कामगारांना संपावर जाण्यास भाग पाडणे हे थांबवायला हवे. आज या मागण्या पूर्ण केल्या नाही तर मग कधी होणार? कोर्टाने 7.30 ला ऑर्डर दिली आहे, आमची सभा सुरू होती. कोर्टाचे स्वागत आणि आदर आहे. पण तुम्ही चर्चेला या प्रशासनाची भूमिका मांडावी. मागील 3 महिन्यांपासून पत्र व्यवहार सुरू आहे. पालिकेत नवीन बॉडी आली त्यात आधीचे आयुक्त आताचे आणि आधीचे तसेच बेस्ट अधिकारी या सगळ्यांना मागणी केली. मात्र कोणीच काय केले नाही. असं मत बेस्ट कृती समितीने व्यक्त केलं आहे.
BEST Employees Strike: संपामुळे बेस्ट सेवा पुरती विस्कळीत, बस थांब्यांवर प्रवाशांची मोठी गर्दी
आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्ट कृती समितीने पुकारलेल्या संपामुळे बेस्ट सेवा पुरती विस्कळीत झाली आहे, एकीकडे शशांक राव आणि प्रसाद लाड यांच्या संघटनांनी संप मागे घेण्याच आवाहन केलं असल तरी मोठ्या संख्येने कर्मचारी संपात सहभागी झाले झाल्याने बेस्ट सेवा जवळजवळ ठप्प झाली आहे आणि याचा फटका मुंबईकरांना बसला आहे. बस थांब्यांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत असून संपाची पूर्व कल्पना नसलेल्या मुंबईकरांना ऐन सकाळी मनस्ताप सहन करावा लागतोय. या संपावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी मुंबईकरांनी केली आहे,
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप; प्रमुख मागण्या नेमक्या काय? (BEST employees strike, What exactly are the key demands)
– बेस्ट सेवांचे कंत्राटीकरण थांबवा
-बेस्ट मालमत्तांचा पीपीपी तत्वावर पुनर्विकासाला विरोध
– बेस्टचा स्वतंत्र अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करा
-निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी एकरकमी द्या
-कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने सोडवा
संपाचा मुंबईकरांना फटका; बेस्ट संपामुळे मुंबईकरांच्या अडचणी वाढणार?
-बस सेवा विस्कळीत होण्याची शक्यता
-लाखो प्रवाशांना प्रवासासाठी अडचणी
-पर्यायी वाहतुकीवर ताण वाढणार
-वीज विभागावर परिणामाची शक्यता
-वीजपुरवठा व्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती
–मुंबईतील वाहतूक आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम
Raut vs Mahajan Operation Tiger : फोडाफोडी Vs तुडवातुडवी;गिरीश महाजन संजय राऊत भिडले Special Report