Team India : टीम इंडियाला 440 व्होल्टचा झटका, स्टार खेळाडू वर्ल्ड कपमधून बाहेर | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

टीम इंडियाच्या खेळाडूला दुखापत झाली होती. दुखापतीनंतर आता स्टार खेळाडू वर्ल्डकप बाहेर झाल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे.

News18
News18

Shreyanka Patil News : वुमेन्स वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सलग दोन सामने जिंकून वर्ल्ड कप मोहिमेची चांगली सूरूवात केली आहे. टीम इंडियाने काल नेदरलँडला हरवून दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे.  या सामन्या दरम्यान टीम इंडियाच्या खेळाडूला दुखापत झाली होती. दुखापतीनंतर आता स्टार खेळाडू वर्ल्डकप बाहेर झाल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे.

वुमेन्स टी20 वर्ल्डकपमध्ये बुधवारी टीम इंडियाने नेदरलँडचा 95 धावांनी पराभव केला होता.टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 209 धावा केल्या होत्या.या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड 114 धावांवर ऑलआऊट झाली होती.त्यामुळे टीम इंडियाने हा सामना 95 धावांनी जिंकला आहे.या विजयानंतर टीम इंडियाला मोठा धक्का बसला होता. कारण टीम इंडियाच्या श्रेयांका पाटीलला स्ट्रेचरवरून बाहेर नेण्यात आले होते.

त्याचं झालं असं  हरमनप्रीत कौरने सहावी ओव्हर टाकायला श्रेयांका पाटीलला बोलावले होते.यावेळी श्रेयांकाच्या पहिल्या बॉलवर शॉर्ट खेळताच तिनेच धावत जाऊन बॉल अडवण्याचा प्रयत्न केला होता. हा बॉल अडवताना तिचा पाय मुरगळला होता. पाय मुरगळल्यानंतर श्रेयांका पाटीलला उठतातच येत नव्हते, त्यामुळे लगचे फिजिओला बोलावण्यात आले. पण फिजिओला बोलावूनही तिला चालता येत नव्हते.

त्यामुळे शेवटी श्रेयांका पाटीलसाठी स्ट्रेचर बोलावण्यात आली.त्यानंतर तिला गाडीतून मैदानाबाहेर नेण्यात आले आहे.त्यानंतर आता 24 तासात तिच्यावर उपचार करण्यात आले.या दरम्यान तिच्या घोट्याच्या लिगामेंटमध्ये दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुखापतीमुळे श्रेयंका पाटील टी-२० विश्वचषकातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान अजून श्रेयांका पाटीलच्या जादी बदली खेळाडूची अद्याप घोषणा झाली नाही आहे.त्यामुळे टीममध्ये तीची जागा कोण घेतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *