Guru Nakshatra Parivartan 2026 : अखेर आलीच ती वेळ…! गुरु-पुष्य नक्षत्रामुळे 5 राशींवर ओढावणार आर्थिक संकट, लवकरच कोसळणार दु:खाचा डोंगर, सावध व्हा


Guru Nakshatra Parivartan 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज देवगुरु बृहस्पती ग्रहाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, गुरु आणि पुष्य नक्षत्राचा संयोग हा फार महत्त्वाचा मानला जातो. पुष्य नक्षत्रांचा राजा मानलं जातं. शनि याचा स्वामी ग्रह आहे. मात्र, गुरु या नक्षत्राच्या उच्च स्थानी आहे. त्यामुळे विशेष फळ मिळणार आहे. मात्र, गुरु पुष्याचं हे संक्रमण सर्व राशींसाठी शुभकारक नसणार आहे. 

गुरु ग्रहाच्या या नक्षत्र परिवर्तनाने काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. कारण याचा तुमच्या आर्थिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी गुरुचं हे नक्षत्र परिवर्तन सामान्य असणार आहे. या काळात तुमच्या खर्चात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. तसेच, काही वैचारिक मतभेद देखील होऊ शकतात. या कालावधीत पैशांची गुंतवणूक करु नका. यामुळे तुम्हाला मनस्ताप देखील होईल. तसेच, तुमचं आर्थिक नुकसान होण्याची देखील शक्यता आहे. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरुचं पुष्य नक्षत्रात प्रवेश करणं मानसिकदृष्ट्या हानिकारक ठरु शकतं. या कालावधीत तुमचा मानसिक ताण वाढेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार देखील वाढणार नाही. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर तुमचे संबंध खराब होतील. त्यामुळे तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही गोष्टीत हलगर्जीपणा करु नका. आरोग्याची काळजी घ्या. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांना या काळात नशिबाची साथ मिळणार नाही. तुमच्या व्यवसायात तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गातील लोकांना कामाचा दबाव जाणवेल. यासाठी वेळीच पैशांचा जपून वापर करा. आर्थिकदृष्ट्या कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या राजकारणापासून स्वत:ला दूरच ठेवण्याचा प्रयत्न करा. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गुरुचं पुष्य नक्षत्रात प्रवेश होणं काहीसं आव्हानात्मक ठरु शकतं. या काळात तुमच्या करिअरमध्ये अनेक प्रकारचे अडथळे येण्याची शक्यता आहे. तुम्हाला पैशांची आर्थिक चणचण सुद्धा जाणवू शकते. तसेच, या काळात कोणताही लांबचा प्रवास करताना काळजी घ्या. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला विशेष काळजी घेण्याची गरज आहे. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 18 June 2026 : आज गुरुवारचा दिवस 8 राशींसाठी भाग्याचा; दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; वाचा आजचे राशीभविष्य



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *