यंदा विदर्भात थोडी लवकर पावसाला सुरुवात होईल, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, अमरावती या पट्ट्यांमध्ये जोरदार पाऊस होईल. त्यानंतर पश्चिम विदर्भात पाऊस हजेरी लावेल, त्यानंतर मराठवाड्यात चांगला पाऊस होईल आणि सर्वात शेवटी उत्तर महाराष्ट्रात पावसाची एन्ट्री होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.
