Mumbai: अवघ्या सेकंदाचा फरक, सुसाट ईलेक्ट्रिक कारने 3 दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू, घटनेचा LIVE VIDEO | मुंबई बातम्या (Mumbai News)


Last Updated:

 विलेपार्ले पूर्व येथील स्टेशन रोडवरील मोगीबाई मार्केट परिसरात  संध्याकाळी  साडेचार ते पाचच्या सुमारास ही घटना घडली. 

News18
News18

मुंबई : मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचा अपघात झाला होता. या अपघातात २ जणांना आपला जीव गमवावा लागला. इलेक्ट्रिक बसमध्ये बिघाड झाल्यामुळे अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. आता पुन्हा एकदा एका इलेक्ट्रिक कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला आहे तर २ जण जखमी झाले आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील  विलेपार्ले पूर्व येथील स्टेशन रोडवरील मोगीबाई मार्केट परिसरात  संध्याकाळी  साडेचार ते पाचच्या सुमारास ही घटना घडली.  एका भरधाव इलेक्ट्रिक कारने तीन दुचाकीस्वारांना पाठीमागून जोराची धडक दिली.  कार चालक विलास श्रीधर गव्हाणकर (वय ४४) असं कारचालकाचं नाव आहे.  मोगीबाई मार्केट परिसरातून जात असताना अचानक कारचालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं. भरधाव वेगात कारने समोर येईल त्याला धडक दिली.

या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं आहे की, भरधाव कार प्रचंड वेगात होती. अवघ्या काही सेकंदात तिने दुचाकी आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या नागरिकांना जोराची धडक दिली. दुचाकींना धडक दिल्यानंतर एका विज मीटरवर जाऊन कार आदळली.  या अपघातात स्कुटीवर असलेल्या किंजल हिरेन शहा (वय ४१) यांचा मृत्यू झाला आहे.  तर  निर्मला डोजीया आणि प्रेमजी डोजीया हे दोघे जखमी झाली आहे.  जखमींना तातडीने गावडे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून उपचार सुरू आहे.

धक्कादायक म्हणजे, रेल्वे स्टेशन रोडवर नेहमी गर्दी असते, या गर्दी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली आहे. कारचालक विलास गव्हाणकर याला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास विलेपार्ले पोलीस करत आहे.

मराठी बातम्या/मुंबई/

Mumbai: अवघ्या सेकंदाचा फरक, सुसाट ईलेक्ट्रिक कारने 3 दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू, घटनेचा LIVE VIDEO



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *