Rajabhau Waje : ‘…अन् भर पत्रकार परिषदेत खासदार वाजेंच्या डोळ्यात आलं पाणी’; निष्ठेवरून संजय राऊतांकडून तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या ऑपरेशन टायगर आज सक्सेसफुल झाल्याचं दिसून आलं आहे, तर काल (मंगळवारी, ता16) रात्रीपासून ठाकरे गटाचे फुटीर खासदार एक-एक करुन दिल्लीत दाखल व्हायला सुरुवात झाली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Operation Tiger UBT Shivsena) हे देखील काल रात्री दिल्लीत दाखल झाले होते. यानंतर ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांना अज्ञातस्थळी ठेवण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेल्या सहा खासदारांनी अखेर दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना भेटून आपण स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र दिले. लोकसभा अध्यक्षांनी या स्वतंत्र गटाला मंजूरी दिली असून बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाच्या स्थापनेची प्रक्रिया दिल्लीत पूर्ण झाली आहे. त्यानंतर हा गट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत विलीन होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी फुटीर खासदारांवर संताप व्यक्त केला, तर  यावेळी त्यांनी 

Rajabhau Waje :  नाशिकचे खासदार राजभाऊ वाजे भावूक

दिल्लीत ऑपरेशन टायगर सुरू असतानाच खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. शिवसेना,  बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे आणि शिवसैनिकांचे काय नाते आहे, ते पोटतिडकीने सांगत होते, त्याच वेळी संजय राऊत यांच्या बाजूला बसलेले फारसे व्यक्त न होणारे नाशिकचे खासदार राजभाऊ वाजे यांच्यां डोळ्यात अश्रू तरळले. संजय राऊत आपली भूमिका मांडत असताना राजाभाऊ वाजे यांच्या भावना दाटुन आल्यात. एका बाजूला ऑपरेशन टायगरमुळे पक्षा निष्ठा बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना दुसरीकडे आपल्या पक्षावर नेत्यावर ओढवलेल्या परिस्थितीमुळे खासदार राजभाऊ वाजे भावूक झाले.

लोकसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाच्या फुटीर गटाला मंजुरी देण्याआधी दिल्लीत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेस राऊत यांच्यासह खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे उपस्थित होते. यावेळी भर पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) हे पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे त्यांचे तोंडभरून कौतुक केले. मात्र याचवेळी खासदार राजभाऊ वाजे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ज्यावेळी राऊत त्यांचे कौतुक करत होते त्यावेळी वाजे यांना आपल्या भावना अनावर झाल्या. पत्रकार परिषदेत (Press Conference) कॅमेऱ्यासमोरच जजे यांचा हात दोनदा डोळ्यांवर गेला आणि त्यांनी डोळ्यांतील अश्रू पुसले. 

Shivsena news:  ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे

1. अनिल देसाई

2. अरविंद सावंत

3. संजय दिना पाटील

4. राजाभाऊ वाजे

5. संजय जाधव

6. संजय देशमुख

7. नागेश पाटील आष्टीकर

8. ओमराजे निंबाळकर

9. भाऊसाहेब वाकचौरे

Shivsena UBT MPs: कोणते खासदार शिंदे गटाच्या वाटेवर?

1. संजय जाधव

2. संजय देशमुख

3. नागेश पाटील आष्टीकर

4. ओमराजे निंबाळकर

5. भाऊसाहेब वाकचौरे

6. संजय दिना पाटील

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *