Last Updated:
Aamir Khan: सोशल मीडियावर एक नवा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये आमिर खान त्याच्या तिन्ही पत्नी म्हणजेच गौरी, किरण आणि रिना यांच्यासह एकाच कारमधून प्रवास करताना दिसत आहे.
मुंबई: बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या कोणत्याही चित्रपटामुळे नाही, तर त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे तुफान चर्चेत आला आहे. रिना दत्ता आणि किरण राव यांच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर आमिर खान पुन्हा एकदा संसार थाटण्यासाठी तयार झाला आहे. गेल्याच वर्षी आमिरने त्याच्या ६० व्या वाढदिवशी त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी सर्वांची ओळख करून दिली होती. अशातच आता त्याच्या लग्नाच्या बातमीने सोशल मीडियावर धुमाकूळ उडाला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक नवा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये आमिर खान त्याच्या तिन्ही पत्नी म्हणजेच गौरी, किरण आणि रिना यांच्यासह एकाच कारमधून प्रवास करताना दिसत आहे.
एकाच कारमध्ये आमिर, गौरी आणि किरण
नुकतंच आमिर खानच्या ‘लगान’ या नामांकित चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या ग्रँड सेलिब्रेशनला हे सर्वजण उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आमिर खान ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसला आहे, तर मागच्या सीटवर त्याची एक्स पत्नी किरण राव आणि होणारी पत्नी गौरी स्प्रॅट एकत्र बसून हसताना आणि गप्पा मारताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत किरण आणि आमिरचा मुलगा आझादही होता. हा व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावून गेले आहेत.
कोण आहे आमिरची होणारी बायको गौरी स्प्रॅट?
आमिरच्या आयुष्यात येणारी गौरी स्प्रॅट मूळची बंगळुरूची असून तिची आई र्हीटा स्प्रॅट यांचा तिथे एक मोठा सलून व्यवसाय होता. गौरीच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार, तिने ‘ब्लू माउंटेन स्कूल’मधून शिक्षण घेतले असून २००४ मध्ये ‘युनिव्हर्सिटी ऑफ द आर्ट्स लंडन’मधून फॅशन स्टायलिंग आणि फोटोग्राफीचा कोर्स केला आहे. सध्या ती मुंबईत ‘बीब्लंट’ नावाचे नामांकित सलून चालवते. रिपोर्ट्सनुसार, गौरीला ७ वर्षांचा एक मुलगाही आहे. गेल्या काही काळापूर्वी आमिर आणि गौरी चीनमधील ‘मकाऊ इंटरनॅशनल कॉमेडी फेस्टिव्हल’सह अनेक मोठ्या कार्यक्रमांमध्ये जाहीरपणे एकत्र वावरताना दिसले होते.
दोन लग्नांनंतर आमिरची तिसरी लगीनघाई
आमिर खानचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच खूप चर्चिले गेले आहे. १९८६ मध्ये त्याने रीना दत्तासोबत पळून जाऊन लग्न केले होते, ज्यांच्यापासून त्यांना जुनैद आणि इरा ही दोन मुले आहेत. १६ वर्षांच्या संसारानंतर २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २००५ मध्ये आमिरने किरण रावसोबत दुसरे लग्न केले, ज्यानंतर २०२१ मध्ये त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही घटस्फोटांनंतरही आमिरने आपल्या दोन्ही एक्स पत्नींशी असलेले नाते आणि आदर कधीच कमी होऊ दिला नाही. मुलांच्या संगोपनापासून ते कौटुंबिक पार्ट्यांपर्यंत हे सगळेजण नेहमीच एकत्र दिसतात. आता गौरीच्या एन्ट्रीने या अनोख्या कुटुंबात आणखी एक नवा अध्याय सुरू होणार आहे.
Mumbai,Maharashtra
गौरीसोबत दोन्ही Ex Wifes ना एकाच कारमध्ये घेऊन निघाला आमिर, VIDEO पाहून तुम्हीच सांगा ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’?
