Last Updated:
गुवाहाटीतील नीलाचल टेकड्यांवर वसलेले कामाख्या मंदिर, भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे. हे मंदिर तीन दिवस एका खास कारणामुळे बंद राहणार आहे.
Kamakhya Temple : भारतात अशी अनेक मंदिरे आहेत जी त्यांच्या परंपरा आणि मान्यतांसाठी प्रसिद्ध आहे. 51 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कामाख्या मंदिर हे खास मानले जाते. भक्तांसाठी श्रद्धास्थान असलेलं हे मंदिर जितकं रहस्यमयी आहे तितकंच या मंदिराचे 3 दिवस बंद असणं रहस्यमयी मानलं जात. आसाम येथील कामाख्या देवीचं मंदिर हे अध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र आणि जागृत मानलं जात. अशी मान्यता आहे की, इथे कोणतीही इच्छा मागितली की भक्तांची इच्छा पूर्ण होते. पण आता चर्चा सुरू आहे ती म्हणजे 22 जूनपासून 3 दिवस या मंदिराचे दरवाजे बंद करण्यात येणार आहेत.
आसाममधील गुवाहाटी येथील प्रसिद्ध 51 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कामाख्या देवी मंदिरात वार्षिक ‘अंबुबाची मेळा’ 22 जूनच्या रात्रीपासून सुरू होत आहे. हा पूर्व भारतातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव मानला जातो. या मेळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे उत्सवाच्या सुरुवातीचे तीन दिवस मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी पूर्णपणे बंद राहतील. या काळात देवीच्या वार्षिक मासिक पाळीचा काळ मानला जातो, ज्यामुळे संपूर्ण मंदिर परिसरात विशेष धार्मिक आणि तांत्रिक विधी केले जातात. मंदिर प्रशासनाने मंगळवारी जाहीर केले की, 22 जून रोजी रात्री 9 वाजून 8 मिनिटे 42 सेकेंदाने ‘प्रवृत्ती’ विधीने मेळ्याची सुरुवात होईल. या विधीने माता कामाख्याच्या वार्षिक मासिक पाळीची सुरुवात होईल. या वर्षी लाखो भाविक आणि देशभरातून येणारे साधू-संत या महोत्सवात सहभागी होण्यासाठी गुवाहाटीमध्ये दाखल होऊ लागले आहेत.
धार्मिक मान्यतेनुसार, 22 जूनच्या रात्री देवी कामाख्या मासिक पाळीच्या चक्रात प्रवेश करते. यामुळे 23, 24 आणि 25 जून या तीन दिवसांत मंदिराच्या मुख्य गर्भगृहात कोणत्याही प्रकारची पूजा किंवा दर्शन घेण्यास सक्त मनाई असते. या काळात निसर्गाची निर्मिती क्षमता आणि स्त्री शक्तीचा उत्सव साजरा केला जातो. मंदिरामध्ये कोणतीही मूर्ती नसून एका खडकाच्या भेगेतून नैसर्गिक पाण्याचा प्रवाह वाहतो, ज्याची पूजा केली जाते. 26 जून रोजी सकाळी मंदिराचे दरवाजे उघडण्यापूर्वी गर्भगृहाचे विशेष शुद्धीकरण आणि महापूजा केली जाते, त्यानंतरच सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जातो.
अंबुबाची मेळा हा भारतातील शक्ती उपासनेशी संबंधित सर्वात महत्त्वाच्या उत्सवांपैकी एक मानला जातो. असे मानले जाते की, या काळात देवी कामाख्याला वार्षिक मासिक पाळी येते. गुवाहाटीतील नीलाचल टेकड्यांवर वसलेले कामाख्या मंदिर, भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे. हे मंदिर, विशेषतः तांत्रिक परंपरेचे अनुयायी आणि हिंदू भक्तांसाठी, एक अत्यंत महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळ मानले जाते. या तीन दिवसांच्या विशेष काळात, नियमित धार्मिक विधी स्थगित केले जातात आणि मंदिर बंद राहते. हे देवीच्या मासिक पाळीच्या काळातील एकांतवासाचे प्रतीक आहे. मंदिर पुन्हा उघडल्यावर, अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या पवित्र अंगोदक आणि अंगवस्त्र ग्रहण करण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने येतात.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Mumbai,Maharashtra
