Gold and Silver Rate Today: भारतात मौल्यवान धातू सोने आणि चांदीला (Gold and Silver) विशेष महत्त्व आहे. लग्नसराई म्हटलं की सोनं (Gold rates) खरेदी आलंच. कोणताही सणवार म्हटलं की, सोन्याचे किंवा चांदीचे (Gold rates in India) दागिने हमखास खरेदी केले जातात. सोनं – चांदीच्या दरात बरेच चढ उतार झाले असल्याचं आपण पाहतो. दररोज सोनं किंवा चांदीच्या दरात चढ – उतार होत असतात. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि देशांतर्गत बदलत्या समीकरणांमुळे सोनं – चांदीच्या दरात बदल हा होत असतो. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दराचा आलेख हा चढताच राहिला आहे. दरम्यान, आज सोन्याच्या दरात घट झाली असल्याचं पाहायला मिळत आहे.
सोन्याच्या दरात घट (Todays Gold rate)
आजचा सोने अन् चांदीचा दर
आज 17 जून 2026 रोजी सोन्याच्या दरात 400 रुपयांची घसरण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल 1 तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला 1,50,400 रुपये मोजावे लागत होते. दरम्यान, आज सोन्याच्या दरात 400 रुपयांची घट झाली आहे. आज 10 ग्रॅम सोनं खरेदीसाठी आपल्याला 1,50,000 रुपये मोजावे लागतील. तर, 10 तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला 15,00,000 रुपये मोजावे लागतील. विशेष म्हणजे, चांदीच्या दरातही कमालीची घसरण झाली आहे.
चांदीची चमक कमी झाली (Todays Silver Rate)
आज चांदीच्या दरात 4 हजार रुपयांची घट झाली आहे. काल म्हणजेच 16 जूनला 1 किलो चांदीचा दर 2,54,000 इतके होते. दरम्यान, आज चांदीच्या दरात 4 हजार रुपयांची घसरण झाली आहे. आज 1 किलो चांदीसाठी आपल्याला 2,50,000 रुपये मोजावी लागतील. सोनं आणि चांदीच्या दरात झालेली घसरण पाहून सोने खरेदीदारांना नक्कीच आनंद झाला आहे.
गुड रिटर्न्स या वेबसाईटनुसार, आज 24 कॅरेट 1 तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला 1,51,100 रुपये मोजावे लागतील. तर, 10 तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला 15,11,000 रुपये मोजावे लागतील. तर 22 कॅरेट 1 तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला 1,38,500 रुपये मोजावे लागतील. तर, 10 तोळं खरेदीसाठी आपल्याला 13,85,000 रुपये मोजावे लागतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!