Vaibhav Sooryavanshi : मैदानात धक्काबुक्की, शिवीगाळ… पण बाहेर येताच वैभव सूर्यवंशीने कुणाचे पाय धरले? कोणीच न पाहिलेला Video समोर, नेमकं काय घडलं?


Vaibhav Sooryavanshi in Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यावर असलेला 15 वर्षांचा युवा भारतीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी सध्या चर्चेत आहे. 15 जून रोजी भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील रोमांचक सामना खेळवला गेला. हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि भारताचा त्यात पराभव झाला. मात्र, या सामन्यानंतर मैदानावरील एका वादाचा आणि त्यानंतर घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मैदानात झाला राडा! (Vaibhav Sooryavanshi Sri Lanka A vs India A)

सामना सुपर ओव्हरमध्ये गमावल्यानंतर वैभव सूर्यवंशी पॅव्हेलियनमध्ये परतत होता. त्याच वेळी श्रीलंकेच्या एका खेळाडूने वैभवला काहीतरी डिवचले. यावर संतापलेल्या वैभवने त्याला धक्का दिला, ज्याला प्रत्युत्तर म्हणून श्रीलंकेच्या खेळाडूनेही वैभवला धक्का दिला. दांबुलाच्या मैदानावर घडलेल्या या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि क्रीडा जगतात याची मोठी चर्चा रंगली.

राड्यानंतर वैभवने कुणाचे धरले पाय? (Vaibhav Sooryavanshi Sri Lanka A vs India A)

मैदानावरील या राड्यानंतर काही वेळातच वैभव सूर्यवंशीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला, ज्याने सर्वांची मने जिंकली. या व्हिडिओमध्ये वैभव श्रीलंकेचे माजी दिग्गज क्रिकेटपटू अनुरा तेन्नेकून (Anura Tennekoon) यांचे पाया पडून आशीर्वाद घेताना दिसला.

अनुरा तेन्नेकून कोण आहेत? (Who Is Anura Tennekoon)

अनुरा तेन्नेकून हे श्रीलंकेच्या क्रिकेट इतिहासातील अत्यंत मोठे नाव आहे. 1975 च्या पहिल्यावहिल्या एकदिवसीय विश्वचषकात (World Cup) त्यांनी श्रीलंका संघाचे कर्णधारपद भूषवले होते. ते श्रीलंकेचे पहिले वनडे कॅप्टन आहेत. दांबुला मैदानावर जेव्हा 15 वर्षांच्या वैभवची आणि अनुरा तेन्नेकून यांची भेट झाली, तेव्हा वैभवने भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. यावर अनुरा तेन्नेकून यांनी वैभवला पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि एक मोलाचा सल्लाही दिला. 

या सामन्यात वैभवने 14 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 21 धावा केल्या. भारताने प्रथम फलंदाजी करत 265 धावा केल्या, तर श्रीलंकेनेही 50 षटकांत 265 धावाच केल्या. सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. 

हे ही वाचा –

Vaibhav Sooryavanshi : अंधार पडला, अंपायरने निर्णय बदलला… अन् वैभव सूर्यवंशीचा संयम सुटला! मग भारत-श्रीलंका मॅचमध्ये जे झालं त्याने क्रिकेट जग हादरलं, पाहा Video





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *