Sanchita Ugale Co Star Ujjawal Sharma: टेलिव्हिजन अभिनेत्री (TV Actress) संचिता उगले (Sanchita Ugale) हिनं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे अख्खी इंडस्ट्री हादरली आहे. अवघ्या 30 वर्षांच्या संचितानं प्रसिद्धीच्या शिखरावर असूनही असं टोकाचं पाऊल का उचलंलं, हे कोडंच आहे. संचितानं रविवारी 14 जून रोजी राहत्या घरात पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. तिनं आजवर अनेक गाजलेल्या हिंदी मालिकांमध्ये (Hindi Serial) काम केलंय. तिच्या जाण्यानं तिच्या सहकलाकारांनाही धक्का बसला आहे. इंटस्ट्रीतील तिचे अनेक को-आर्टिस्ट तिनं घेतलेल्या टोकाच्या निर्णयावर हळहळ व्यक्त करत आहेत.
संचिता उगले (TV Actress Sanchita Ugale) हिनं एवढं टोकाचं पाऊल का उचललं? किंवा तिला नेमकी कशाची चिंता सतावत होती? याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तरीही, या घटनेमुळे मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली असून, अभिनेत्रीनं असं टोकाचं पाऊल का उचललं? या विचारानं सर्वजण थक्क झाले आहेत. दरम्यान, ‘साजन घर’ या मालिकेत संचितासोबत काम केलेल्या एका अभिनेत्यानं संचिता उगले आणि तिचा को-स्टार उज्वल शर्मा यांच्या कथित अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. आता अभिनेता उज्वल शर्मा यानं समोर येत, चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तसेच, अफवांना पूर्णविराम दिला आहे.
लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती संचिता उगले? (Sanchita Ugale In Live-In Relationship?)
संचिता उगले हिनं आत्महत्या केली आणि तिच्याबाबतच्या अनेक चर्चांना उधाण आलं. अशातच एक चर्चा रंगलेली उज्वल शर्मासोबतच्या अफेअरची. आता या चर्चांना स्वतः उज्वल शर्मा यानं समोर येत पूर्णविराम दिला आहे. तसेच, यावर स्पष्टीकरणंही दिलंय.
टेली चक्करला दिलेल्या खास मुलाखतीत बोलताना उज्वल यानं म्हटलं की, आमच्या कथित अफेअरबद्दलच्या चर्चांमध्ये, अफवांमध्ये अजिबात तथ्य नाही, आम्ही कधीही रिलेशनशिपमध्ये नव्हतो. किंबहुना, ती दुसऱ्या कोणाशी तरी रिलेशनशिपमध्ये होती आणि त्याच्यासोबत राहत होती, अशी माहिती समजतेय. मी तिच्याशी बऱ्याच काळापासून बोललेलोसुद्धा नाही, सुमारे दोन ते अडीच महिने झाले असतील. मी सध्या माझ्या गावी आहे आणि बऱ्याच काळापासून तिच्याशी माझा संपर्क नव्हता.
उज्वल पुढे बोलताना म्हणाला की, “तिच्या एक्स-बॉयफ्रेंडमुळे ती अत्यंत कठीण परिस्थितीतून जात होती आणि मदतीतही घेत होती. तिची मानसिक स्थिती लक्षात घेऊन, प्रोडक्शन हाऊसनंही तिच्या उपचारांची आणि आवश्यक त्या मदतीची व्यवस्था केली होती. जे काही घडलंय, ते अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. मलाही याबद्दल काही काळापूर्वीच समजलंय…”
संचिताच्या मृत्यूमुळे तणावात को-अॅक्टर्स (Co-Actors In Tension Due To Sanchita Ugale Death)
टेलिव्हिजन इंडस्ट्रीला संचिताच्या आत्महत्येनं जबर धक्का बसला आहे. मित्र, को-अॅक्टर्स आणि चाहते संचिताच्या जाण्यानं भावूक झाले आहेत. अद्याप संचिताच्या मृत्यूचं अधिकृत कारण अजूनही समोर आलेलं नाही. या घटनेबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ‘टेलीचक्कर’नं (TellyChakkar) ‘साजन घर’ (Sajan Ghar) या मालिकेत ‘विवान’ची भूमिका साकारणाऱ्या उत्कर्ष कोहलीशीही संवाद साधला. दुःख व्यक्त करताना उत्कर्ष म्हणाला, “मला एका मित्राकडून याबद्दल समजलंय. हे सर्व इतक्या अचानक घडलंय की, त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे आणि ही अत्यंत दुःखद घटना आहे…” संचितासोबत काम करण्याचा अनुभव सांगताना तो पुढे म्हणाला की, “ती अतिशय आनंदी आणि कामाप्रती निष्ठावान मुलगी होती. ती खूपच तरुण होती, त्यामुळे आमची फारशी मैत्री झाली नाही. ती काही वैयक्तिक समस्यांतून जात होती, पण त्या विषयांवर तिच्याशी चर्चा करण्याइतपत आमची जवळीक नव्हती. हे खरोखरंच दुर्दैवी आहे…” संचिता ‘कुमकुम भाग्य’ आणि ‘साजन घर’ यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांचा भाग होती. तसेच, तिनं विक्की कौशल स्टारर ‘छावा’ (Chhaava) सिनेमातही झळकली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
ABP Majha च्या बातम्या LIVE
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष