MP कॅमेरा आणि 100W फास्ट चार्जिंग असलेला रेडमीचा नवीन 5G फोन भारतात होणार लाँच – Marathi News | Redmi new 5G phone with a 50MP camera and 100W fast charging to launch in India tomorrow


भारतीय बाजारपेठेत अनेक नवनवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. अशातच उद्या 16 जून रोजी रेडमी कंपनी भारतात ‘Redmi Turbo 5’ नावाचा आणखी एक नवीन 5जी फोन करणार आहे. हा फोन उद्या दुपारी 1:30 वाजता (IST) लाँच केला जाईल. या विशेष लाँच कार्यक्रमाचे कंपनीच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि यूट्यूब चॅनलवर थेट प्रक्षेपण (लाइव्ह-स्ट्रीम) केले जाईल. त्यामुळे जर तुम्ही भविष्यात हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजच्या लेखात आपण या फोनची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

Redmi Turbo 5 ची अपेक्षित किंमत

कंपनीने अद्याप फोनची किंमत जाहीर केलेली नाही, परंतु हा हँडसेट या वर्षाच्या सुरुवातीला चीनमध्ये CNY 2,299 म्हणजे भारतीय चलना नुसार अंदाजे 30 हजार रूपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. यावरून असे सूचित होते की, भारतात Redmi Turbo 5 ची किंमत 40 हजार रूपयांच्या पेक्षा कमी असू शकते, ज्यामुळे तो POCO X8 Pro च्या किंमत श्रेणीत येईल.

Redmi Turbo 5 ची वैशिष्ट्ये

मिळालेल्या अहवालानुसार रेडमी टर्बो 5 च्या चीनी आणि भारतीय व्हेरिएंट मधील एकमेव फरक बॅटरी क्षमतेचा आहे. भारतीय मॉडेलमध्ये 100W हायपरचार्ज सपोर्टसह 7,540mAh क्षमतेची बॅटरी असण्याची शक्यता आहे, जी चीनी व्हेरिएंटमधील 7,560mAh बॅटरीपेक्षा किंचित लहान आहे.

फोनच्या डिस्प्लेचा आकार सुमारे 6.59 इंच असू शकतो, ज्यामुळे तो एक कॉम्पॅक्ट फोन बनेल. या हँडसेटमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,200 निट्सच्या पीक ब्राइटनेससह 1.5K AMOLED डिस्प्ले देखील असू शकतो, जो FHD+ पॅनलपेक्षा उत्तम व्हिज्युअल्स आणि अधिक स्मूथ स्क्रोलिंगचा अनुभव देईल.

फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 अल्ट्रा चिपसेट आहे. यामध्ये 12GB पर्यंत LPDDR5X अल्ट्रा रॅम आणि UFS 4.1 स्टोरेज असण्याची शक्यता आहे. या हार्डवेअरच्या कॉम्बिनेशनमुळे उत्कृष्ट गेमिंग परफॉर्मन्स, जलद ॲप लोडिंग आणि सुरळीत मल्टीटास्किंगचा अनुभव मिळेल.

Redmi Turbo 5 कॅमेरा स्पेसिफिकेशन्स

फोटोग्राफीसाठी Redmi Turbo 5 मध्ये OIS आणि EIS सपोर्ट असलेला 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा असण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा असण्याचीही शक्यता आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 20 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *