सॅमसंग गॅलेक्सी एस25 एजवर बंपर डिस्काउंट, फ्लिपकार्टवर खरेदी करा फक्त इतक्या कमी ‍किमतीत – Marathi News | Bumper discount on samsung galaxy s25 edge buy it on flipkart at such a low price


सॅमसंगच्या अल्ट्रा-स्लिम फ्लॅगशिप स्मार्टफोन असलेला गॅलेक्सी एस25 एजवर मोठी सूट मिळत आहे. फ्लिपकार्टच्या सध्या सुरू असलेल्या जून एपिक सेलमध्ये हा सॅमसंग फोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत उपलब्ध करण्यात आलेला आहे. भारतात 1 लाख 09 हजार 999 रूपये या सुरुवातीच्या किमतीत लाँच झालेला हा फोन आता 59 हजार 999 रूपयांच्या किमतीत खरेदी करता येईल. चला तर मग आजच्या लेखात आपण फ्लिपकार्टवर गॅलेक्सी एस25 एज स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

सॅमसंग गॅलेक्सी एस२५ एज स्मार्टफोन डील्स आणि सवलती

सॅमसंग गॅलेक्सी एस२५ एजचा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेला स्मार्टफोन सेल दरम्यान 59 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज असलेल्या दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत 71 हजार 999 रुपये आहे. हा फोन टायटॅनियम सिल्व्हर आणि टायटॅनियम जेटब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो.

कंपनी फ्लिपकार्ट ॲक्सिस आणि फ्लिपकार्ट एसबीआय क्रेडिट कार्डवर अतिरिक्त 3 हजार रूपयांची सूट देखील देत आहे. या बँक सवलतीनंतर हा फोन 56 हजार 999 रूपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एस25 एजची वैशिष्ट्ये

सॅमसंग गॅलेक्सी एस25 एजमध्ये 6.7-इंचाचा क्वाड-एचडी+ (1,440 x3,120 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले असून त्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आहे. तसेच या फोनच्या डिस्प्लेला कॉर्निंग गोरिला ग्लास सिरेमिक 2 चे संरक्षण आहे. हा सॅमसंग फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटवर चालतो, जो 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेजसह येतो. हा फोन अँड्रॉइड 15 वर आधारित वन यूआय 7 वर चालतो.

कॅमेरा सेटअपच्या बाबतीत बोलायचं झाल्यास सॅमसंग गॅलेक्सी एस25 एजमध्ये 2x ऑप्टिकल इन-सेन्सर झूम आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह 200-मेगापिक्सलचा प्रायमरी इमेज सेन्सर आहे. या फोनमध्ये 12-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा देखील आहे. या सॅमसंग फोनमध्ये 12-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरासुद्धा आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस25 एजमध्ये 3,900mAh क्षमतेची बॅटरी आहे. हे 25W वायर्ड आणि क्यूआय (Qi) वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5जी, 4 एलटीई, वाय-फाय 7, ब्लूटूथ 5.4, एनएफसी, जीपीएस आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट यांचा समावेश आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *