Deepti Sharma : दीप्ती शर्माच्या निशाण्यावर आता झुलन गोस्वामीचा मोठा विक्रम, किती विकेट्सची गरज? – Marathi News | Team india deepti sharma has a chance to break Jhulan goswami most international wickets record in Womens cricket


टीम इंडियाची अनुभवी फिरकीपटू दीप्ती शर्मा हीने आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात धमाका केला. दीप्तीने पाकिस्तान विरुद्ध 5 विकेट्स घेतल्या. दीप्तीने या 5 विकेट्स घेत भारताच्या विजयात प्रमुख योगदान दिलं. दीप्तीने या 5 विकेट्स घेण्यासह मोठा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. दीप्ती टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्यानंतर आता दीप्तीच्या निशाण्यावर आणखी 1 वर्ल्ड रेकॉर्ड आहे. दीप्तीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम हा माजी गोलंदाज छकडा एक्सप्रेस अर्थात झुलन गोस्वामी हीच्या नावावर आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *