Weekly Horoscope 15 To 21 June 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजपासून जून (June 2026) महिन्याचा तिसरा आठवडा सुरु झाला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 15 ते 21 जून 2026 असा या आठवड्याचा कालावधी आहे. दरम्यान नवीन आठवडा कसा असणार? फायदा होणार की नुकसान? अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. त्यामुळे तूळ ते मीन राशींसाठी (Zodiac Signs) आजपासून सुरु होणारा आठवडा (Weekly Horoscope) नेमका कसा असणार आहे ते जाणून घेऊयात.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीसाठी आजपासून सुरु होणार आठवडा भाग्यशाली असणार आहे. या कालावधीत तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. कामाच्या बाबतीत तुमचं डेडीकेशन दिसून येईल. उत्पन्नाची नवीन साधनं तुमच्यासमोर निर्माण होतील. घरातील वातावरण आनंदी असणार आहे. तसेच, मित्रांच्या सहयोगाने तुमची सगळी कामं पूर्ण होतील.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा समाधानाचा असणार आहे. या कालावधीत काही महत्त्वाची कामं तुमची वेळेत पार पडतील. तसेच, नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. हाती घेतलेल्या कार्यात यश आल्यामुळे तुम्ही फार समाधानी असाल. आठवड्याच्या शेवटी पार्टनरला भेटण्याची संधी मिळेल. वाहन चालवताना घाई करु नका.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
धनु राशीसाठी आजपासून सुरु होणारा आठवडा सावधानतेचा असणार आहे. या कालावधीत ग्रहांच्या संक्रमणाचा तुमच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. बॉसकडून कामाचं कौतुक केलं जाईल. मात्र, काही नवीन जबाबदाऱ्याही तुमच्यावर सोपवण्यात येतील.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीसाठी नवीन आठवडा काहीसा अनुकूल असणार आहे. या काळात घराच्या बाबतीत काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. जर तुम्हाला नवीन बिझनेसची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी हा काळ शुभकारक असणार आहे. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करु नका. समाजात मान-सन्मान टिकून राहील.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांनी नवीन आठवड्यात आपला आत्मविश्वास ढळू देऊ नये. या कालावधीत तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. तुमची थोडी धावपळ होऊ शकते. पण त्यातून तुमचं काम झाल्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. मित्र परिवाराचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. संध्याकाळच्या वेळी धार्मिक स्थळाला भेट द्या.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या आठवड्यात तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील. त्यामुळे तुम्ही फार खुश असाल. एखादी मोठी डील तुमच्या हाती लागू शकते. काही नवीन लोकांशी तुमच्या भेटीगाठी वाढतील. तुमच्या वैवाहिक नात्यात गोडवा निर्माण झालेला दिसेल. मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 5 राशींना लागणार लॉटरी; फक्त एका राशीला सावधानतेचा इशारा, साप्ताहिक राशीभविष्य
Pune Rain : अर्धा जून संपला तरी पुण्यात पाऊसच नाही, 2014 नंतर प्रथमच पुण्यात 15 जूनपर्यंत पाऊस नाही