Last Updated:
Shocking Incident In Vasai : रविवारचा दिवस असल्याने प्रत्येकजण निवांत होता. पण दुपारी असं काही परिसरात घडणार आहे याची कल्पनाही कोणी केली नव्हती. त्यातच दुपार झाली आणि संपूर्ण परिसरच हादरुन गेला. पोलीस प्रशासन आणि परिसरातील असंख्य नागरिकांची गर्दी एका ठिकाणी जमली.
नालासोपारा : वसईतील एका परिसरात रविवारी नेहमीप्रमाणे नागरिक आराम करत होते सुट्टीचा आनंद घेते होते. मात्र अचानक दुपारच्या वेळेत परिसरातील नागरिकंची तुफान गर्दी जमली आणि सर्वांचे लक्ष पाहिले तर एका उंच ठिकाणी जात होते. त्यानंतर तातडीने प्रशासनालाही घटनास्थळी यावे लागेल. काही तासांच्या घटनेमुळे पूर्ण शहरात सध्या चर्चा होताना दिसून येतेय.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या समोर आलेली घटना ही वसई शहरातील सुरक्षा स्मार्ट सिटी परिसरातील आहे. जिथं भल्या मोठ्या उंच असलेल्या विजेच्या टॉवरवर एक महिला चढली होती. साधारण 15 ते 20 फुट उंचावर ही महिला आत्महत्येचा प्रयत्न करत होती त्यानंतर ही महिला त्या टॉवरवर बसून कोणाशी तरी मोबाईलवर बोलताना दिसत होती.
दुपारची वेळ असल्याने प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त होते. त्या क्षणीच या उंच टॉवरवर ही महिला नागरिकांना दिसली. त्यानंतर तातडीने सर्वांनी माहिती पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाला दिली.
घटनास्थळी परिसरातील नागरिकांची गर्दी, पोलीस प्रशासन सर्व जमले. त्यांनी टॉवरवर चढलेल्या महिलेशी पहिल्यांदा संवाद साधण्याचा प्रयत्न केला. अर्धातास गेला संवाद सुरुच राहिला. शेवटी काही तास समजूत काढल्यानंतर महिलेला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले.
या संपूर्ण प्रकाराने परिसरात तुफान गर्दी जमली होती. महत्त्वाचे म्हणजे महिलेने असे का टोकाचे पाऊल उचलले होते यामागचे कारण अजूनही पोलिस प्रशासनाला समजले नाही. शिवाय महिलेची ओळखही अद्याप समोर आलेली नसून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
Mumbai,Maharashtra
वसई हादरली! भल्या मोठ्या टॉवरवर महिला दिसली नको त्या स्थितीत; भरदुपारी उडाली खळबळ
