विदर्भ विभागात अमरावती जिल्ह्यासाठी उष्णतेचा येलो अलर्ट असेल. तर भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या सात जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट आहे. या भागांत मेघगर्जनेसह वादळी पाऊस होईल. ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
