Sejal Pawar: 370 बिर्याणी प्रकरणानंतर हिमांशू जांगडाला (Himanshu Jangra) नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं. यानंतर डॉ. सेजल पवार (Sejal Pawar) हिचा प्रणित मोरेच्या (Pranit More) कॉमेडी शोमधील व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. डॉ. सेजल पवारला जबरदस्त ट्रोलिंगला सामना करावा लागला. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर एमबीबीएस विद्यार्थिनी सेजल पवार हिच्यावर किंग एडवर्ड मेमोरिअल हॉस्पिटल आणि सेठ गोर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेजने कठोर कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेज प्रशासनाने तिला 15 दिवसांसाठी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. या कालावधीत सेजलला केईएम हॉस्पिटल, सेठ गोर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेजचा परिसर किंवा वसतिगृहात प्रवेश दिला जाणार नाही. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी संस्थेनं 5 सदस्यीय चौकशी समिती स्थापन केलीये. समितीला 7 दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले की, हा वाद समोर आल्यानंतर सेजल पवारला तिच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आलंय. या घटनेनंतर संस्थेत आलेल्या सेजलच्या आई वडिलांची प्रशासनाने बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेजलचे कुटुंब सध्या चिंतेत आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी संस्थेनं पाच सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. समितीला सात दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चौकशी अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती आहे.
15 दिवसांसाठी सेजल पवारला नो एन्ट्री (Pranit More Show Sejal Pawar Controversy)
महाविद्यालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात हे स्पष्ट झालं आहे की, व्हिडीओमध्ये दिसणारी तरुणी सेजल पवार आहे. तिनं व्हिडीओमध्ये केलेले दावे अस्वीकार्य आहे. या आधारावर संस्थेनं तिच्यावर अंतरिम कारवाई केली असून, तिला 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या 15 दिवसांमध्ये सेजल नियमित वर्ग, प्रशिक्षण, महाविद्यालयीन उपक्रम आणि इतर शैक्षणिक कार्यक्रमांना अनुपस्थित राहिल.
हा सगळा वाद नेमका आहे तरी काय?
प्रणित मोरेच्या शोमध्ये हिमांशू जांगडानं एका तरुणीसोबत डेटवर गेल्याचा अनुभव शेअर केला होका. तसेच डॉ. सेजल पवार या तरुणीनं वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित एका संवेदनशील विषयावर टिपण्णी केली. तिनं मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्ट्सवर भाष्य केलं. त्यानंतर अनेकांनी तिच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. तिचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होताच, सेजलवर टीकेची झोड उठली.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष