Gulabi Saadi: ‘गुलाबी साडी’ सुपरहिट ठरलं, पण मानधन.., प्राजक्ता घागनं सांगितला खास किस्सा


Gulabi Sadi Actress: प्रसिद्ध गायक संजू राठोड (Sanju Rathod) आपल्या हटके गाण्यातील शैलीसाठी ओळखला जातो. त्यानं हिट गाणे देऊन प्रेक्षकांना भूरळ घातली.  ‘गुलाबी साडी’ या गाण्यामुळे त्याला खरी ओळख मिळाली.  ‘गुलाबी साडी’ (Gulabi Saadi), ‘शेकी शेकी’, ‘सुंदरी सुंदरी’या हिट गाण्यांमुळे तो रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याचं नुकतंच ‘लाल लाल कलरची बांगडी’ हे गाणं रिलीज झालं होतं. या गाण्यावर अनेक तरुणाई थिरकली. पण त्याला खरी ओळख ‘गुलाबी साडी’ या जगभरात गाजणाऱ्या गाण्यानं दिली.  ‘गुलाबी साडी’ या गाण्यानं परदेशातील लोकांनाही भूरळ घातली.  या गाण्यात प्राजक्ता घाग या अभिनेत्रीनं काम केलं होतं.    या गाण्यातून तिला विशेष ओळख मिळाली. 

अभिनेत्रीचा संजू राठोडबद्दल खास खुलासा (Gulabi Saadi Actress on Sanju Rathod)

प्राजक्ता घाग ही सोशल मीडियात सक्रीय असते. अलिकडेच तिनं मुलाखत दिली होती.  या मुलाखतीत तिनं  ‘गुलाबी साडी’ या गाण्यात काम करतानाचा अनुभव सांगितला. तसेच एक किस्साही शेअर केला. ‘गुलाबी साडी’ या गाण्यासाठी अभिनेत्रीनं फ्रिमध्ये काम केलं होतं. संजू राठोड याच्याकडून एक रुपयाही घेतला नव्हता,  असा खुलासा अभिनेत्रीनं मुलाखतीत केला.  अलिकडेच प्राजक्ता घाग या अभिनेत्रीनं ‘द मराठी फाऊंडर’ला मुलाखतीत दिली होती.  या मुलाखतीत तिनं या गाण्यातून मिळालेल्या मानधनाविषयी भाष्य केलं. 

या गाण्यासाठी मिळालेल्या मानधनाबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, ‘मी संजू राठोडला त्याच्या फर्स्ट गाण्यापासून बघत आलेय.  आम्ही तेव्हा Collaborationमध्ये काम करत होतो.  मला ठाऊक होतं की, मला केवळ ट्रॅव्हलिंग मिळणार आहे.  अॅटलिस्ट मला त्यानं ट्रॅव्हलिंग तरी दिलं’, असं प्राजक्ता म्हणाली.  

संजू राठोडविषयी बोलताना अभिनेत्री म्हणाली,  ‘संजू राठोडला मी बघितलं आहे, त्याचं स्ट्रगल पाहिलं आहे.   त्यानं त्याचं गाणं विकण्यासाठी खूप प्रयत्न केले.   अशावेळी मी का मागेन की मला पण दे पैसे.. मी स्वार्थी मुळीच नाही. फक्त पैसा पाहिजे असं अजिबात नाही,  मला ओळख पाहिजे होती’, असं अभिनेत्री म्हणाली.

”गुलाबी साडी’ या गाण्यापर्यंत त्याचं स्ट्रगल होतं.   मी कधी त्याला एवढे पैसे दे, तेवढे पैसे दे असं केलं नाही. तो आपल्या गाण्यांसाठी स्वत:चे पैसे लावत होता.  तेव्हा त्याला इनकम नव्हतं, मग मी पैसे कसे आणि का मागेन’, असं अभिनेत्री म्हणाली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

वडिलांना सांगितलं 10 मिनिटांत येतो, पण नियतीच्या मनात…पत्नीला माहेरी सोडून परतल्यानंतर प्रसिद्ध इन्फ्लुएंसरचा अपघाती मृत्यू



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *