केळीपासून बनवलेला फेसपॅक तुमच्या चेहऱ्याला बनवेल चमकदार, फक्त ‘ही’ एक गोष्ट करा मिक्स – Marathi News | A face pack made from banana will make your face glow just do this one thing and mix it


उन्हाळ्यात धूळ आणि प्रदूषणाचा आपल्या त्वचेवर सर्वात मोठा परिणाम होतो. यामुळे चेहरा निस्तेज होतो. त्वचा काळवंडणे आणि तिची चमक पूर्णपणे नाहीशी होणे, या समस्या प्रत्येकाला होत असतात. अशा परिस्थितीत, चमकदार आणि निरोगी त्वचा मिळवणे हे एका आव्हानापेक्षा कमी नसते. यासाठी आपण महागडी ब्युटी प्रोडक्टचा वापर तसेच स्किन केअर उपचार केले जातात. पण या उपचारा दरम्यान प्रोडक्टमध्ये असलेल्या केमिकलमुळे कालांतराने त्वचेचे अधिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे अनेकजण नैसर्गिक आणि घरगुती उपाय करण्याला महत्व देत आहे. अनेकदा आपण चांगल्या आरोग्यासाठी फळांचे सेवन करत असतो त्यातच केळं देखील मोठ्या आवडीने खातो. पण हे केळं आरोग्यासोबच त्वचेसाठी देखील खूप प्रभावीपणे काम करतात.

केळी केवळ तुमच्या आरोग्यासाठीच नव्हे तर तुमच्या त्वचेसाठीही वरदान आहेत. त्यामध्ये असलेले जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेचे पोषण करतात, तसेच त्वचेला मऊ करून नैसर्गिक चमक परत येण्यास मदत करतात. यासाठी केळ्यापासून फेसपॅक बनवण्यासाठी फक्त एका केळ्यामध्ये हा घटक मिक्स करून लावल्यास त्वचा चमकदार होते. चला तर मग आजच्या लेखात आपण चमकदार त्वचेसाठी केळ्यांचा वापर कसा करायचा हे जाणून घेऊयात.

केळी आणि मध

जर तुम्हाला तुमची त्वचा उजळ करायची असेल, तर केळं आणि मधापासून तयार फेसपॅक लावल्याने त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि ती लक्षणीयरीत्या नितळ दिसते. यासाठी एका वाटीत अर्धे केळे कुस्करून त्यात मध टाका. सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा. हा मास्क 20 मिनिटे तसाच ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. केळ्यामुळे तुमच्या त्वचेच‍ पोषण मिळेल त्याशिवाय यातील मधामुळे त्वचा ओलसर आणि मऊ होईल.

केळी आणि दही

उन्हाळ्यात त्वचा टॅन झाली असेल तर दही आणि केळ्याचा फेस पॅक देखील प्रभावी परिणाम देतो. एक पिकलेले केळे कुस्करून घ्या आणि त्यात दही मिक्स करा. हा तयार फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवा. तुम्हाला लगेच फरक जाणवेल. दह्यामधील लॅक्टिक ॲसिड त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा रंग सुधारतो आणि तो अधिक तेजस्वी दिसतो. हा मास्क त्वचेचा काळपटपणा आणि डाग हलके करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

केळी आणि बेसन

जर तुमचा चेहरा जास्त काळवंडला असेल तर बेसन आणि केळ्याचे मिश्रण लावणे फायदेशीर ठरू शकते. यासाठी 1 चमचा बेसन अर्ध्या कुस्करलेल्या केळ्यामध्ये मिक्स करा आणि ते तुमच्या चेहऱ्यावर लावा. तुम्ही हा पॅक तुमच्या मानेवर, हातांवर आणि पायांवर देखील लावू शकता. पॅक सुकल्यावर, तो चोळून काढून टाका. यामुळे चेहऱ्यावरील केस, मृत त्वचा देखील निघून जाते आणि तुमचा चेहरा चमकदार व मुलायम होतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *