Stand Up Comic Madhur Virli: आज काल स्टॅन्डअप कॉमेडीयन्सला झालंय काय ? असा प्रश्न पडावा इथपर्यंत खालच्या स्तरावरची विधानं ते त्यांच्या स्टॅन्ड अप कॉमेडी शोमध्ये वापरताना दिसत आहेत. बिग बॉसचा माजी स्पर्धक आणि कॉमेडियन प्रणित मोरे सध्या ‘370 बिर्याणी ‘ वादात सापडला असतानाच आता आणखी एका कॉमेडियनचं महिलांवरील अत्याचारावर केलेली केळसवाडी कॉमेडी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर संतापाची लाट उसळली असून कॉमेडियन मधुर विरली त्याच्या अश्लील, असभ्य आणि असंवेदनशील वक्तव्यामुळे अडचणीत आला आहे. महिलेवर अत्याचार करणाऱ्या बलात्कारी पुरुषावर आणि अत्याचारित महिलेच्या होणाऱ्या खूनावर तो बोलला आहे.
मधुर विरालीने केलं instagram अकाउंट डिलीट
प्रणित मोरे नंतर कॉमेडियन मधुर विरालीला त्याचं instagram अकाउंट डिलीट करावं लागलं आहे. त्यामुळे सुरू असलेल्या या वादला आणखी खतपाणी मिळालं. त्याचा व्हायरल व्हिडिओवर अभिनेत्री उर्फी जावेदने संतप्त प्रतिक्रिया दिली असून ‘आता आपण बलात्कारावर विनोद करत आहोत का ? पुरुष विनोदवीरांनो ..कृपया तुमच्या टीम मध्ये काही महिलांना सामील करा,म्हणजे तुम्हाला थोडी अक्कल येईल मूर्खांनो.. ‘असं उर्फी म्हणाली.
नेमकं काय आहे व्हिडिओमध्ये ?
ज्या कॉमेडियनमुळे हा वाद उफाळला आहे,त्याचं नाव मधुर विराली असं आहे. व्हायरल होत असलेल्या त्याच्या व्हिडिओमध्ये महिला अत्याचारावर अतिशय असंवेदनशील आणि किळसवाणी कमेंट करताना मधुर दिसत आहे. त्याने अक्षरशः लाज पळून पिल्याचं यात दिसत आहे.आणि इतकी अश्लील कमेंट ऐकून उपस्थित लोक हसत होते. त्यामुळे इतक्या खालच्या स्तरावरील विनोदाचं सामान्यीकरण होत असल्याची टीका त्याच्यावर होत आहे.
इनकी ऑडियंस की दिमागी हालत कैसी होगी जो इस तरह की घटिया बातों पर भी हस रही है कॉमेडी और फ्रीडम ऑफ स्पीच के नाम पर इनलोगों ने गंद मचाया हुआ है #madhurvirli pic.twitter.com/n1JI01VCpP
— Aakash Mishra (@aakash_mishra1) June 14, 2026
नेमका हा वाद सुरू झाला कुठून ?
या सगळ्या प्रकरणाची सुरुवात प्रणित मोरेने होस्ट केलेल्या एका लाईफ शो दर मिळाला झाली . हिमांशू जांगडा या प्रेक्षकांमधील उपस्थित असलेल्या तरुणाने केलेल्या असंवेदनशील वक्तव्यामुळे मोठा वाद झाला. एका महिलेला डेटवर नेल्यानंतर 370 रुपयांची बिर्याणी या तरुणाने महिलेला खाऊ घातले.पण घरी सोड म्हणल्यानंतर, ‘370 रुपये खर्च केले आहेत आता वसूल तर करावे लागतील ‘ असं साधल्याची वर्णनं त्यांना सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा सोडत केली. त्याच्या विनोदावर उपस्थित जमाव अक्षरशः चेकाळला होता. देशातील स्टॅन्डअप कॉमेडियन्सच्या वक्तव्यावर चिंता व्यक्त केली जात आहे.
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष