Prem Bhati: पत्नीला माहेरी सोडून घरी परतण्यापूर्वीच इन्फ्लुएंसर प्रेम भाटी याचा दुर्देवी मृत्यू झाला. घराच्या हाकेच्या अंतरावर असताना तरुणाची खडीवरुन दुचाकी घसरली. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम भाटी असे तरुणाचे नाव असून, तो कल्याण नजीकच्या मोहने परिसरातील रहिवासी होता. रस्त्यावर पडलेल्या खडींमुळेच तरुणाचा मृत्यू झाला, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान, स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
नेमकं घडलं काय? (Social media influencer Prem Bhati lost his life in bike Accident)
शनिवारी रात्री घरी 11 वाजेच्या दरम्यान प्रेम भाटी मोहने परिसरात परतत होता. घरापासून काही अंतरावर असताना प्रेमच्या वडिलांनी त्याला विचारपूस करण्यासाठी फोन केला होता. कुठपर्यंत प्रेम पोहोचला, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी फोन केला होता. 10 मिनिटांत पोहोचेन असं प्रेमनं सांगितलं. पण प्रेम काही घरी सुखरुप पोहोचलेला नाही. दुर्देवाने, रस्त्यावर पडलेल्या खड्यांवर प्रेमची दुचाकी घसरली. यातच त्याचा अपघात झाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली.
स्थानिक रहिवाशांनी त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेले, मात्र, उपचारापूर्वीच त्याचे दुर्देवी निधन झाले. त्याच्या निधनानंतर भाटी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याची माहिती सोशल मीडियात पसरताच शोककळा पसरली आहे.
दरम्यान, रस्त्यावर पडलेल्या खडींमुळे प्रेमचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप, रिक्षा युनियनच्या अध्यक्ष यांनी केलाय. या प्रकरणी महापालिका अधिकारी आणि कंत्राटदाराच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही यावेळी रिक्षा युनियनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी केलाय.
प्रेम भाटीच्या निधनानंतर सोशल मीडियात शोककळा
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम भाटीच्या वडिलांचे हेअर स्टाईलचे दुकान आहे. प्रेम हा सोशल मीडियात प्रचंड सक्रीय होता. त्याचे इन्स्टाग्रामवर 83 हजार फॉलोअर्स आहेत. तर, यूट्यूबवरही जवळपास 3 मिलिअन सबस्क्रायबर्स आहेत. त्यानं आपल्या रिल्सद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. दरम्यान, प्रेम भाटीच्या निधनानंतर सोशल मीडियात शोककळा पसरली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
प्रसिद्ध यूट्यूबर – इन्फ्ल्युएंसरला घरात घुसून संपवलं; मेहुण्यानेच साथीदारांसह रचला कट, कारण काय?
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष