Maharashtra Rain El Nino Updates: प्रशांत महासागरात अतिशय तीव्र ‘एल निनो’ (El Nino) सक्रिय झाला असून, तो 1950 नंतरचा सर्वात भीषण ठरण्याची शक्यता अमेरिकेच्या हवामान संस्थेने वर्तवली आहे. याचा थेट व विपरीत परिणाम भारतातील आणि महाराष्ट्रातील मान्सूनवर (Maharashtra Rain) होत असून, पावसाचे प्रमाण कमी होणे व दुष्काळाचे सावट वाढण्याची भीती हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनच्या प्रवाहात अडथळे येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात चिंतेचं वातावरण आहे. याचदरम्यान, जपान आणि अमेरिकेच्या संस्थांनी एक दिलासादायक माहिती दिली आहे. (Maharashtra Rain El Nino Updates)
हिंदी महासागरात इंडियन ओशन डायपोल अर्थात आयओडी सकारात्मक होण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास पावसाची तूट भरून निघेल, असा अंदाज आहे. जपान आणि अमेरिकेच्या संस्थांनी मान्सूनसाठी दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे. प्रशांत महासागरात ‘एल निनो’ सक्रिय झाल्याचं जाहीर झाल्यावर यंदाच्या मान्सून हंगामाविषयी सर्वच स्तरांतून चिंता व्यक्त होऊ लागली. मात्र, ‘एल निनों’ची तीव्रता वाढत असताना जुलैमध्ये हिंदी महासागरात ‘इंडियन ओशन डायपोल’ची सकारात्मक स्थिती विकसित होण्याचा अंदाज या संस्थांनी जाहीर केला आहे. आयएमडीने मात्र इंडियन ओशन डायपोल तटस्थ राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. (Maharashtra Rain El Nino Updates)
जपान आणि अमेरिकी संस्थांचा मॉन्सूनसाठी दिलासादायक अंदाज- (Maharashtra Rain El Nino Updates)
जपानी हवामानशास्त्र संस्था आणि अमेरिकेच्या ‘नॉर्थ अमेरिकन मल्टी मॉडेल एन्सेम्बल’ नुसार जुलैमध्ये हिंद महासागरातील तटस्थ स्थिती जाऊन ‘पॉझिटिव्ह आयओडी’ विकसित होऊ शकतो. ऑगस्टपासून ‘पॉझिटिव्ह आयओडी’ची तीव्रताही वाढू शकते. ‘एल निनो’सोबत सकारात्मक ‘आयओडी’ची स्थिती निर्माण झाल्यास मान्सून काळातील पावसाची तूट काही प्रमाणात भरून निघण्यास मदत होते. पूर्व आफ्रिकेजवळच्या पश्चिम हिंद महासागराचे तापमान जास्त राहिल्याने ‘पॉझिटिव्ह आयओडीची’ स्थिती निर्माण होते. त्यामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांना जोर येऊन त्यांच्याबरोबर येणाऱ्या बाष्पामुळे भारतात चांगला पाऊस होतो.
मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सून दाखल होण्यासाठी 20 जून उजाडण्याची शक्यता- (Maharashtra Rain Updates)
प्रशांत महासागरातील ‘एल निनो’चा प्रभाव व अफगाणिस्तानकडून येणाऱ्या गरम व कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनची वाटचाल रोखली गेली असून, मान्सून सध्या रत्नागिरीमध्येच रेंगाळला आहे. या कोरड्या वाऱ्याचा प्रभाव कमी झाला की मान्सूनच्या पुढील प्रवासाला सुरुवात होणार आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सून दाखल होण्यासाठी आता थेट 20 जून उजाडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मान्सूनच्या वाटेत नवे संकट? (El Nino Update)
भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मान्सून अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. अशा परिस्थितीत एल निनोची तीव्रता वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. हवामान अभ्यासकांच्या मते, याचा परिणाम पावसाच्या वितरणावर होऊ शकतो. काही भागांमध्ये पावसाचे आगमन उशिरा होण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यवृष्टी होऊ शकते. दुसरीकडे, काही भागांना अल्प कालावधीत अतिवृष्टीचाही सामना करावा लागू शकतो. पावसातील हा असमतोल विशेषतः कृषी क्षेत्रासाठी आव्हानात्मक ठरू शकतो. याशिवाय, एल निनोच्या प्रभावामुळे जागतिक स्तरावर तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
संबंधित बातमी:
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या