नाशिक-शिर्डी रेल्वेचा गेमचेंजर प्लॅन, ‘या’ 34 गावांत भूसंपादनाला गती, काय होतंय? | नाशिक बातम्या (Nashik News)


रेल्वेच्या भूसंपादनासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत नाशिक जिल्ह्याचे समन्वय अधिकारी (भूसंपादन) राजेंद्र वाघ यांच्या डिजिटल स्वाक्षरीने 25 मे रोजी भूसंपादन आदेश जारी करण्यात आले आहेत. नाशिक आणि सिन्नर या दोन तालुक्यातील 34 गावांच्या भूसंपादनाची जबाबदारी उपविभागीय अधिकारी, निफाड यांच्याकडे सोपवली आहे.

दरम्यान, भूसंपादन करण्यात येणाऱ्या 34 गावांमध्ये सिन्नर तालुक्यातील 23 तर नाशिक तालुक्यातील 11 गावांचा समावेश आहे. या गावांच्या भूसंपादनाचे काम उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. 1 नाशिक यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

प्रकल्पात समाविष्ट गावांची यादी

सिन्नर तालुका: कुंदेवाडी, कुंदेवाडी माजरे, वडझिरे, दातली, पाथरे खुर्द, दुसुंगवाडी, खोपडी खुर्द, पांगरी खुर्द, पांगरी बु., मलढोण, खंबाळे, सिन्नर, फुलेनगर, ब्राम्हणवाडे, मुसळगाव, देशवंडी, जायगांव, वावी, सायाळे, पाटपिंप्री, बारागावपिंप्री, भोकणी, सुंदरपपूर.

नाशिक तालुका: विहितगाव, बेलतगव्हाण, चांदगिरी, जाखोरी, देवळाली, चेहड़ी बु., संसरी, मोहगांव, बाभळेश्वर, पंचक आणि चांडेगाव.

रेडिरेकनरनुसार मोबदला

रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पासाठी 2013 च्या भूसंपादन अॅक्टनुसार रेडिरेकनर दराने शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला वितरित केला जाईल. रेल्वे अॅक्टनुसारच भूसंपादनाची प्रक्रिया पार पडणार असून ती शॉर्ट टर्म असेल. सोमवारनंतर गावनिहाय संपादित करावयाच्या गटांची सूची प्रसिद्ध करण्यात येईल, असे निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *