Somavati Amavasya 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 15 जून 2026 रोजी म्हणजेच उद्या येणारी सोमवती अमावस्या ही अत्यंत विशेष मानली जाणारी अमावस्या आहे. याचं कारण म्हणजे तब्बल 30 वर्षांनंतर अधिक मासात असा दुर्मिळ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे याचा लाभ अधिक पटीने मिळणार आहे.
सोमवती अमावस्या तिथी शुभ मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार, अमावस्या तिथीची सुरुवात 14 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, या तिथीची समाप्ती 15 जून रोजी सकाळी 8 वाजून 24 मिनिटांनी होणार आहे. मात्र, उदय तिथीनुसार, सोमवारी ही अमावस्या असल्या कारणाने पवित्र व्रत, दान आणि स्नान 15 जून रोजी करावे.
सोमवती अमावस्येच्या दिवशी ‘या’ 5 गोष्टी नक्की करा
पवित्र स्नान आणि सूर्याला अर्ध्य
सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून पवित्र नदीत किंवा घरीच पाण्यात थोडं गंगाजल टाकून स्नान करावे आणि सूर्यदेवाला अर्ध्य द्यावे. त्यामुळे आरोग्यात सुधारणा होते.
शिवलिंगावर विशेष अभिषेक करावा
सोमवारचा दिवस आणि सोमवती अमावस्या एकत्र आल्याने भगवान शंकराची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या दिवशी शंकराच्या पिंडीवर कच्चं दूध, जल आणि बेलपत्र अर्पण करुन ऊॅं नम:शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा.
पिंपळाच्या झाडाची परिक्रमा
सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडामध्ये त्रिदेवांचा (ब्रह्मा, विष्णू, महेश) यांचा वास मानला जातो. या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध-पाणी अर्पण करुन 108 वेळा परिक्रमा केल्यास जीवनातील आर्थिक अडचणी दूर होतात.
पितृदोष निवारण आणि तर्पण
जर कुंडलीत पितृदोष असेल किंवा कामात सतत अडथळे येत असतील, तर, या दिवशी पितरांचे स्मरण करुन तर्पण आणि पिंडदानाचा विधी करावा. यामुळे पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो.
महादान आणि पुण्य
गरजू लोकांना अन्न, वस्त्र, काळे तीळ किंवा छत्री दान केल्याने राहू-केतू आणि शनी ग्रहांचे दोष शांत होतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीप माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :
Shul Yog 2026 : 14 जूनची तारीख लक्षात ठेवा! शूल योगामुळे पुढचे 20 तास ‘या’ 4 राशींवर असणार टांगती तलवार, हातून निसटेल पैसा
Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव