सुनेची बॉलिंग, लेक साराची फिल्डिंग, सचिन तेंडुलकर चक्क विमानात खेळले क्रिकेट, व्हिडीओ एकदा पाहाच! – Marathi News | Sachin tendulkar plays cricket in airplane daughter in law Saaniya Chandhok balling sara tendulkar fielding watch


सचिन तेंडुलकर, सून सानिया चंडोक आणि मुलगी सारा तेंडुलकरImage Credit source: Twitter

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटरवर इतकं प्रेम आहे की त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या खेळासाठी समर्पित केलं. वयाच्या 16 व्या वर्षी क्रिकेट विश्वात पदार्पण करणारे सचिन वयाच्या 40 व्या वर्षांपर्यंत क्रिकेट खेळले. सचिन तेंडुलकर यांनी जरी प्रोफेशनल क्रिकेट खेळणं सोडून दिलं असलं तरी क्रिकेटने मात्र त्यांना अजूनही सोडलेलं नाही. म्हणूनच जेव्हा जेव्हा संधी मिळते, तेव्हा ते बॅट उचलून खेळायला सुरू करतात. ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ते चक्क विमानात क्रिकेट खेळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांची सून सानिया चंडोक ही बॉलिंग करतेय आणि लेक सारा तेंडुलकर फिल्डिंग करत आहे.

सचिन तेंडुलकर यांनी हा मजेशीर व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं, ‘कितीही उंचीवर असलो तरी अॅटिट्यू़ड बदलू नये.’ नेमकं या व्हिडीओमध्ये तेच करतान दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये सारा पहिल्याच चेंडूवर सचिन तेंडुलकरांकडे बाद होण्यासाठी विनंती करताना दिसतेय. त्यावर सचिन तिला सांगतात, “तू मला कधीच बाद करू शकणार नाहीस. मी बॅट उलटी धरली तरच तुला संधी आहे.” अर्थात सानिया आणि सारा यांना पहिल्याच प्रयत्नात यश आलं नाही. पण दुसऱ्यांदा साराने चेंडू पकडून वडिलांना बाद केलं. हा व्हिडीओ चाहत्यांना खूपच आवडत आहे. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पहा व्हिडीओ-

‘सर जरा काळजीपूर्वक खेळा, जोरात शॉट मारलात तर विमानाची काचं तुटतील’, असं एकाने लिहिलं. ‘म्हणूनच तुम्ही क्रिकेटचे देव आहात’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. तर ‘पिच आणि बॅट कशी आहे हे महत्त्वाचं नाही, तर खेळणं महत्त्वाचं आहे हे तुम्ही सिद्ध केलात. तुमच्या कुटुंबाला असं पाहून खूप आनंद झाला’, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

सचिन तेंडुलकर आता प्रोफेशनल क्रिकेटरमध्ये सक्रिय नाहीत, मात्र त्यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेत आहे. आयपीएल 2026 मध्ये तो खेळला आणि त्यात त्याने गोलंदाजीतील आपलं कौशल्य दाखवून दिलं. अर्जुनला आगामी आयपीएलच्या सिझन्समध्ये अधिक संधी मिळतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *