Fertility Rate Fallen: भारत देशासाठी एकीकडे चिंताजनक तर काहींच्या मते दिलासादायक बातमी आहे, ती म्हणजे भारताचा एकूण प्रजनन दर पहिल्यांदाच प्रति महिला 1.9 मुलांवर खाली आला आहे. हा दर म्हणजे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या देशात एक मोठा लोकसंख्याशास्त्रीय बदल दर्शवतो. ‘द इकॉनॉमिस्ट’च्या मते, ही घट हे दर्शवते की भारत विकासाच्या एका नवीन टप्प्यावर पोहोचला आहे. यात दशकानुदशके असलेली जलद लोकसंख्या वाढीची चिंता मागे पडून, आता प्रगल्भ होत चाललेली समाजव्यवस्था, लहान होत जाणारी कुटुंबे आणि भविष्यातील मनुष्यबळाची कमतरता यांबाबत चिंता वाढू लागली आहे.
लोकसंख्या वाढीची अवस्था हळूहळू संपत चालली…
‘द इकॉनॉमिस्ट’च्या अहवालानुसार, दिल्लीसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये, जिथे मोठी कुटुंबे सामान्य होती, हा बदल आधीच स्पष्ट दिसू लागला आहे. भारताची लोकसंख्या 1950 मध्ये सुमारे 36 कोटींवरून आज अंदाजे 145 कोटींवर पोहोचली आहे, म्हणजेच जगातील सुमारे एक-सहावा हिस्सा भारतात राहतो. भारताने 2023 मध्ये चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला. पण तज्ज्ञांच्या मते आता लोकसंख्या वाढीची अवस्था हळूहळू संपत चालली आहे. सर्वसाधारणपणे प्रजनन दर हा 2.1 प्रति स्त्री हा आकडा लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक मानला जातो. पण भारताचा 1.9 TFR दर्शवतो की लोकसंख्या पुढील काही दशकांत अजून वाढेल, कारण आधीच्या मोठ्या लोकसंख्येचा परिणाम (demographic momentum) अजूनही चालू आहे. मात्र जर जन्मदर पुन्हा वाढला नाही तर, भविष्यात लोकसंख्या घटण्याची शक्यता वाढत आहे..
भविष्यात कामगारांची कमतरता, कुटुंब लहान होण्याची चिंता?
‘द इकॉनॉमिस्ट’च्या अहवालानुसार, भारताचा एकूण प्रजनन दर म्हणजेच Total Fertility Rate (TFR) पहिल्यांदाच 1.9 प्रति स्त्री इतका खाली आला आहे. हा आकडा replacement level (लोकसंख्या टिकवण्यासाठी आवश्यक असलेला स्तर) पेक्षा कमी आहे, आणि यामुळे देशाच्या लोकसंख्यात्मक रचनेत मोठा बदल दिसून येत आहे. द इकोनोमिस्टच्या अहवालानुसार ही घट दर्शवते की भारत आता लोकसंख्या झपाट्याने वाढण्याच्या काळातून बाहेर पडून (ageing society) च्या दिशेने प्रवेश करत आहे. यामुळे भविष्यात कामगारांची कमतरता आणि कुटुंब लहान होण्याची चिंता वाढत आहे.
‘द इकॉनॉमिस्ट’च्या अहवालानुसार, हा बदल विशेषतः शहरी भागांमध्ये आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये अधिक दिसतो.
दिल्ली: TFR सुमारे 1.2
तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल: सुमारे 1.3
हे आकडे काही युरोपीय देशांच्या पातळीशी तुलनात्मक आहेत.
2019 मध्ये पंतप्रधानांकडून “लोकसंख्या स्फोट” बद्दल इशारा
‘द इकॉनॉमिस्ट’च्या अहवालानुसार, हा बदल भारताच्या अधिकृत विचारसरणीतही मोठा उलटफेर दर्शवतो. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “लोकसंख्या स्फोट” (population explosion) बद्दल इशारा दिला होता. पण आता अनेक तज्ज्ञांमध्ये अशी चिंता वाढत आहे की भारताची स्थिती चीनसारखी होऊ शकते, जिथे 2021 पासून लोकसंख्या घटू लागली आहे.
पायाभूत सुविधा, घरबांधणी आणि सार्वजनिक सेवांवरचा ताण कमी
‘द इकॉनॉमिस्ट’च्या अहवालानुसार, हा बदल भारताच्या अधिकृत विचारसरणीतही मोठा उलटफेर दर्शवतो. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “लोकसंख्या स्फोट” (population explosion) बद्दल इशारा दिला होता. पण आता धोरणकर्त्यांमध्ये अशी चिंता वाढत आहे की भारताची स्थिती चीनसारखी होऊ शकते, जिथे 2021 पासून लोकसंख्या घटू लागली आहे. काही विश्लेषकांचे म्हणणे आहे की लोकसंख्या वाढ मंदावल्यामुळे पायाभूत सुविधा, घरबांधणी आणि सार्वजनिक सेवांवरचा ताण कमी होऊ शकतो. मात्र दुसरीकडे काही तज्ज्ञांचा इशारा आहे की, जलद गतीने प्रगल्भ होणारी लोकसंख्या पेन्शन व्यवस्था, आरोग्य सेवा आणि कुटुंब आधारित आधारव्यवस्थांवर मोठा ताण निर्माण करू शकते.
हेही वाचा :
Health Tips : बदलत्या जीवनशैलीमुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका; बायपास शस्त्रक्रियेबाबत जागरूकतेचा अभाव
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण