Dharashiv Politics : 20 लाखांपासून एक कोटीपर्यंतची बोली, ओमराजे अन् राणाजगजितसिंह पाटलांनी नगरसेवक फोडाफोडीचा बाजार मांडला; ओमराजे निंबाळकरांच्या बंधुंचा खळबळजनक आरोप


Dharashiv Politics : धाराशिवमध्ये ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेच्या नगरसेवकांची फोडाफोडीवरून जोरदार राजकारण तापलं आहे. एकीकडे भाजपात जाणाऱ्या नगरसेवकांनी रातोरात चक्र फिरवली आणि शिवसेनेत प्रवेश झाला. तर दुसरीकडे या नगरसेवक फोडाफोडींमध्ये वीस लाखांपासून एक कोटीपर्यंत बोली लावली गेल्याचा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांचे बंधू तथा शिवसेना ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख मकरंद राजे निंबाळकर (Makarand Raje Nimbalkar) यांनी केला आहे. ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील (Rana Jagjitsingh Patil) यांनी नगरसेवक फोडाफोडीचा बाजार मांडला, असा घणाघात मकरंद राजेनिंबाळकर यांनी केला.

Makarand Raje Nimbalkar: ओमराजे आणि राणा पाटलांनी केलेली फोडाफोडी खपवून घेणार नाही

दरम्यान, ओमराजे निंबाळकर पैसे घेऊन फुटले, तसेच नगरसेवक फोडले. दम होता तर मशाल चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांचा राजीनामा घ्यायचा आणि मग निवडून आणायचं. कळंब मधील नगरसेवक राणा जगजितसिंह पाटलांनी फोडले, ओमराजे आणि राणा पाटलांनी केलेली फोडाफोडी खपवून घेणार नाही. येत्या काळात त्यांना धडा शिकवू, असा निर्धार ठाकरेंच्या शिवसेनेने आता केलाय. नगरसेवक फोडाफोडीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक पार पडली यावेळी शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आगामी काळात धाराशिवमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *