WI vs PAK 2nd Test : पहिल्याच दिवशी पाकिस्तानची पळता भुई थोडी, वेस्ट इंडिजने मैदानात रडवून सोडलं, आता बाबरची पोरं शिकार करणार की शरण जाणार?


West Indies vs Pakistan 2nd Test Update : क्वीन्स पार्क ओव्हल येथे सुरू असलेल्या वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ अखेर यजमान संघाने आपल्या नावावर केला. पावसामुळे व्यत्यय आलेल्या दिवसात पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी काही काळ सामन्यावर वर्चस्व गाजवलं होतं. मात्र दिवसाच्या अखेरीस जस्टिन ग्रीव्ह्स आणि कर्णधार रोस्टन चेस यांनी संयमी आणि जबाबदार फलंदाजी करत वेस्ट इंडिजला मजबूत स्थितीत पोहोचवलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडिजने 5 गडी गमावून 239 धावा केल्या. जस्टिन ग्रीव्ह्स 55 धावांवर तर कर्णधार रोस्टन चेस 36 धावांवर नाबाद परतले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी करत पाकिस्तानला आणखी यश मिळू दिलं नाही.

पावसाआधी विंडीजची दमदार सुरुवात (WI vs PAK 2nd Test)

नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडिजने आक्रमक सुरुवात केली. अवघ्या 10 षटकांत संघाने 49 धावा फलकावर लावल्या. मात्र त्यानंतर पावसामुळे खेळ थांबवावा लागला. पावसापूर्वी पाकिस्तानला पहिलं यश मोहम्मद अलीने मिळवून दिलं. त्याने टेगनारायण चंद्रपॉलला 16 धावांवर बाद करत विंडीजला पहिला धक्का दिला. खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी सामन्याचं चित्र बदललं. अली उस्मानने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिलं विकेट घेत ब्रँडन किंगला 46 धावांवर माघारी धाडलं. त्यानंतर अनुभवी फिरकीपटू साजिद खानने कावेम हॉजला बाद करत वेस्ट इंडिजवर दबाव वाढवला. काही वेळ पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवल्यासारखं वाटत होतं. विंडीजचा डाव मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

ग्रीव्ह्स आणि चेस यांनी डाव सावरला (WI vs PAK 2nd Test)

शाई होप (29) आणि आमिर जंगू (26) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र कसोटी पदार्पण करणाऱ्या उबैद शाहने जंगूला बाद करत पाकिस्तानला चौथं यश मिळवून दिलं. यानंतर जस्टिन ग्रीव्ह्सने अत्यंत संयमी आणि प्रभावी फलंदाजी केली. शाई होप 47 धावांवर बाद झाल्यानंतर पाकिस्तानला उरलेला फलंदाजी क्रम पटकन गुंडाळण्याची संधी होती. मात्र कर्णधार रोस्टन चेसने ग्रीव्ह्सला उत्तम साथ दिली. दोघांनी कोणताही धोका न पत्करता संयमी खेळी केली आणि सहाव्या विकेटसाठी नाबाद 66 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे दिवसअखेर वेस्ट इंडिजने सामन्यावर पुन्हा आपली पकड मजबूत केली.

दुसऱ्या दिवसाची उत्सुकता

आता दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजचा संघ 300 धावांचा टप्पा पार करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. दुसरीकडे पाकिस्तानसमोर शक्य तितक्या लवकर उर्वरित पाच विकेट्स घेण्याचं मोठं आव्हान असेल. पाकिस्तानकडून मोहम्मद अली सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 2 बळी घेतले. याशिवाय उबैद शाह, अली उस्मान आणि साजिद खान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेत वेस्ट इंडिजला मधल्या फळीत धक्के दिले. 

हे ही वाचा –

Ind vs Pak : पाकिस्तानच्या जबड्यातून भारताने हिसकावला विजय; शेवटच्या क्षणी पलटला संपूर्ण सामना, नेमकं काय घडलं? पाक चारीमुंड्या चित



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *