पुण्यात कल्याणीनगर मेट्रो स्टेशनजवळ वाहून आला महिलेचा मृतदेह; पायांची ‘ती’ 2 बोटं उकलणार गुंता? | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

या भागात ५० ते ५५ वर्षे वयोगटातील एका अनोळखी महिलेचा मृतदेह तरंगत्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पाण्यात वाहून आला मृतदेह (प्रतिकात्मक फोटो)
पाण्यात वाहून आला मृतदेह (प्रतिकात्मक फोटो)

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर मेट्रो स्थानकाजवळील नदीपात्रात रविवारी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या भागात ५० ते ५५ वर्षे वयोगटातील एका अनोळखी महिलेचा मृतदेह तरंगत्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. येरवडा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते यांनी दिली आहे.

नदीपात्रातून बाहेर काढण्यात आलेल्या या मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. प्राथमिक तपासात महिलेच्या अंगावर काळा ब्लाउज आणि काळा परकर असल्याचे समोर आले आहे. महिलेच्या गळ्यात पिवळ्या धातूची चेन, कानात कर्णफुले आणि हातात पिवळ्या धातूच्या बांगड्या तशाच आहेत. त्यामुळे ही हत्या आहे, आत्महत्या की अपघात? याबाबत गूढ वाढले आहे.

या संपूर्ण घटनेत पोलिसांच्या हाती एक अतिशय महत्त्वाची खूण लागली आहे. मयत महिलेची दोन्ही पायाची चौथ्या नंबरची बोटे ही इतर बोटांच्या तुलनेत कमालीची बारीक आहेत. या विशिष्ट शारीरिक खुणेवरून पोलीस आता मृत महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. परिचयातील किंवा नातेवाईकांपैकी कोणी बेपत्ता असल्यास, अथवा या वर्णनाची कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने येरवडा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बिर्याणी हाऊसमध्ये आगीचं तांडव 

दरम्यान वाकड-डांगे चौक रस्त्यावरील एका बिर्याणी हाऊसमध्येही रविवारी रात्री भीषण घटना घडली. इथे आगीचा भीषण तांडव पाहायला मिळाला. हॉटेलमध्ये गॅस सिलिंडर बदलत असताना अचानक झालेल्या गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडाला. या थरारक दुर्घटनेत एका १९ वर्षीय निष्पाप कर्मचाऱ्याचा धुरामुळे गुदमरून आणि गंभीर भाजून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अन्य दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात काही काळ प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मराठी बातम्या/पुणे/

पुण्यात कल्याणीनगर मेट्रो स्टेशनजवळ वाहून आला महिलेचा मृतदेह; पायांची ‘ती’ 2 बोटं उकलणार गुंता?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *