Surya Gochar 2026 : सूर्य गोचर रोहिणी नक्षत्रात, 5 राशींसाठी सुवर्णकाळ, नशीब देणार साथ, इच्छापूर्ती होणार !


सूर्य रोहिणी नक्षत्रात काल 25 मे पासून भ्रमण करत आहेत. चंद्राच्या नक्षत्रात सूर्याच्या प्रवेशामुळे उष्णता वाढेल. तसेच वृषभ आणि कर्क यांसह अनेक राशीतील लोकांच्या खिशाला देखील चटका लागेल. ज्योतिष शास्त्रातील गणनेनुसार, सूर्याचं रोहिणी नक्षत्रात भ्रमण जलस्रोतांचे शोषण करेल आणि पृथ्वी जणू तव्यासारखी तापेल. पण सूर्याच्या कृपेने वृषभ, कर्क यांसह काही राशीतील लोकांचा आर्थिक आणि करिअर संबंधित बाबतीत फायद होईल. चला विस्ताराने जाणून घेऊ या, सूर्याच्या रोहिणी नक्षत्रात प्रवेशामुळे कोणत्या राशीांना काय लाभ होणार आहे.

suryaagocharr
काल 25 मे रोजी सूर्याने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला आहे. चंद्राचे प्रिय नक्षत्र रोहिणीमध्ये सूर्य सध्या संचार करत असून यामुळे पुढील 9 दिवस नौतपा लागतील, ज्या दरम्यान सूर्य देव पृथ्वीच्या अधिक जवळ येऊन उन्हं वाढवतील. रोहिणी नक्षत्रात सूर्याच्या या प्रवेशामुळे फक्त उष्णतेचा प्रचंड प्रभाव वाढणार नाही, तर अनेक राशींचे खिसे देखील गरम होऊ शकतात,आर्थिक तंगी जाणवू शकते. मात्र वृषभ, कर्क यांसह अनेक राशींसाठी सूर्याचे गोचर चांगले राहील. त्यांना करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. आत्मविश्वास आणि सामाजिक मान-सन्मानही वाढेल. चला तर मग ज्योतिषी राकेश झा यांच्याकडून जाणून घेऊसूर्य गोचरचा कोणत्या राशीला काय लाभ होईल.

वृषभ राशीवर सूर्य गोचरचा परिणाम

वृषभ राशीवर सूर्य गोचरचा परिणाम

सूर्य आपल्या राशीतच राहून रोहिणी नक्षत्रात संचार करेल. यामुळे हा काळ तुमच्यासाठी अतिशय अनुकूल ठरेल. कार्यक्षेत्रात नेतृत्व क्षमता वाढेल आणि आत्मविश्वास देखील वाढेल. सूर्याच्या या गोचरमुळे तुम्हाला राजकीय व सरकारी क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता अधिक असेल. व्यवसायातही तुमची कमाई वाढेल. सामाजिक प्रभाव व मान-सन्मान पैलूही उंचावतील. प्रमोशन आणि पगारात वाढ होण्याची शक्यता देखील आहे.

कर्क राशीवर सूर्य गोचरचा परिणाम

कर्क राशीवर सूर्य गोचरचा परिणाम

सूर्याचे भ्रमण रोहिणी नक्षत्रात कर्क राशीत एकादश भावात झाले आहे. हे गोचर कर्क राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत लाभदायक राहील. व्यवसायात मोठा लाभ होईल आणि तुमची प्रतिष्ठा वाढेल. प्रॉपर्टीच्या कामांत नक्की फायदा मिळेल. जमेची रक्कम वाढण्याचा योग आहे. जल व तरल पदार्थांच्या व्यवसायात विशेष फायद होईल. आपली इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. वडील, मातृपक्षाकडून लाभ होईल.

सिंह राशीवर सूर्य गोचरचा परिणाम

सिंह राशीवर सूर्य गोचरचा परिणाम

रोहिणी नक्षत्रात सूर्याचे भ्रमण सिंह राशीत दशम भावात झाले आहे. त्यामुळे हे गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील. नोकरी करणाऱ्यांना आर्थिक लाभ आणि पदोन्नती मिळू शकते, तसेच समाजात मान-सन्मान वाढेल. जे नोकरी शोधत आहेत, त्यांना त्यांच्या कौशल्यातून फायदा होईल. करिअरमध्ये प्रगतीची शक्यता असेल आणि व्यावसायिक लाभाच्या संधीही मिळू शकतात. प्रवासाचे योगही राहील. नोकरीत वातावरण सकारात्मक राहील.

कन्या राशीवर सूर्य गोचरचा परिणाम

कन्या राशीवर सूर्य गोचरचा परिणाम

कन्या राशीच्या नवम भावात सूर्याचे रोहिणी नक्षत्रात भ्रमण झाले आहे. हे गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ फलदायी राहील. तुम्ही धार्मिक यात्रा करू शकता आणि धर्म-कर्मात रुचि वाढेल. गुरूदेखील मार्गदर्शन देतील, जे फायदेशीर ठरेल. करिअरच्या क्षेत्रात भाग्य तुमच्यासोबत असेल ज्यामुळे लाभाच्या संधी दिसू शकतात. विदेशी क्षेत्रातून फायदा होईल. तुम्ही काही नवीन काम किंवा उद्योग सुरूही करू शकता.

वृश्चिक राशीवर सूर्य गोचरचा परिणाम

वृश्चिक राशीवर सूर्य गोचरचा परिणाम

तुमच्या राशीत सप्तम भावात सूर्याचे गोचर झाले आहे जे तुमच्या आत्मविश्वासात भर घालेल. व्यवसायात जे भागीदारीत काम करतात, त्यांना यशाची शक्यता आहे. वैवाहिक जीवनासाठी देखीलहे गोचर चांगले राहील. जीवनसाथीशी संबंध मजबूत होतील आणि दांपत्य जीवन मधुर राहील. समाजात मान-सन्मान मिळू शकतो. जर सरकारी कामं अडथळ्यात असतील तर त्या अडचणी दूर होण्याची शक्यता आहे.

प्रियांका लोंढे

लेखकाबद्दलप्रियांका लोंढेप्रियांका लोंढे महाराष्ट्र टाईम्स.कॉम एस्ट्रो रिलिजन सेक्शन मध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर आहेत. गेल्या 10 वर्षांपासून मीडिया क्षेत्रात जर्नालिस्ट,कंटेन्ट रायटर म्हणून काम करत आहेत. धार्मिक, सांस्कृतिक,कला,सामाजिक,चित्रपट,वुमन इश्यू,मनोरंजन,वाईल्डलाईफ अशा विविध क्षेत्राशी निगडीत अनेक विषयांवर त्यांनी बातम्या आणि लेख लिहिले आहेत. धार्मिक विषयात लहानपणापासूनच रुची असल्याने व घरातील वातावरण देखील धार्मिक असल्याने त्यांनी पूजापाठ,व्रत,पारायण याची शिकवण आपल्या आईकडून घेतली. गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ त्यांची आई दत्तगुरूंची सेवा करते. घरात पारायण होतात धार्मिक यात्रा दरवर्षी कुटुंब करते याच गोष्टी त्यांनी बालपणापासून पाहिल्या व आत्मसात केल्या. त्या स्वतः हनुमानजींची भक्ती करतात. आपल्या धार्मिक अनुभवांवरून लेखन करताना वाचकांपर्यंत सत्य धार्मिक लेख,कथा ज्योतिष उपाय त्यांच्या लेखनातून पोहचवतात.

प्रियांका लोंढे यांनी मास्टर इन जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशनमध्ये पदवी घेतली आहे. सध्या महाराष्ट्र टाईम्स.कॉम एस्ट्रो रिलिजन टीममध्ये कार्यरत असून ज्योतिष,टॅरोट कार्ड्स,अंकशास्त्र,धार्मिक कथा कहाण्या यामध्ये त्यांना आवड असल्याने त्यांनी यासर्व गोष्टींचा अभ्यास केला आहे. आपल्या लेखातून त्या नेहमी ज्योतिषीय बातम्या लिहिताना तथ्य पडताळून योग्य संदर्भ देऊन वाचकांपर्यंत सत्य माहिती पोहचवतात. या बाबतीत त्यांना स्वतःचे अनुभव कामी येतात. प्रियांका स्वतः धार्मिक असल्याने त्या अनेक तीर्थस्थळी यात्रा करतात. आपल्या यात्रेतील अनुभव पाठीशी घेऊन तसेच दैनंदिन पूजापाठ कशाप्रकारे करावी संकल्प कसा घ्यावा मनोकामना प्राप्तीसाठी काय करावे हे सर्व त्या स्वतः अनुभव घेऊन आपल्या लेखनातून वाचकांपर्यंत पोहचवतात त्यामुळे त्यांचे लेख वाचकांच्या जास्त जवळ जाऊ शकतात व वाचकांना योग्य ती माहिती मिळते.

धार्मिक लेखनासोबतच प्रियांका लोंढे यांनी महिलांसाठी लेखन केले आहे. त्यांनी लोकमत या वृत्तपत्रात असताना नाईट शिफ्ट करणाऱ्या महिला रात्री प्रवास करताना सुरक्षित असतात का या बाबतीत लोकमत टीमसोबत स्टिंग ऑपरेशन केले होते. ही बातमी वाचकांपर्यंत मोठ्या प्रमाणावर पोहोचली व त्यांच्या टीमचे कौतुक झाले. या स्टिंग ऑपरेशनसाठी त्यांना “रणरागिणी” हा पुरस्कार मिळाला होता. सामाजिक संस्थांसोबत जोडून त्यांनी अनाथ मुले,महिला यांच्या समस्या आपल्या लेखनातून समाजासमोर मांडल्या. सध्या त्या धार्मिक लेखन करत असून आपल्या लेखनातून वाचकांपर्यंत योग्य माहिती पोहचवता यावी यावर विशेष लक्ष देतात. प्रियांका आपल्या लेखात काही ज्योतिष उपाय सांगतात जे त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून असतात शिवाय लाल किताब किंवा ज्योतिष एक्सपर्ट यांनी दिलेल्या माहितीवर आधारित लेख त्या लिहितात.

शिक्षण व कार्य अनुभव
– प्रियांकाने 4 वर्ष लोकमत वृत्तपत्रात विविध विषयांवर पत्रकार म्हणून लेखन केले. त्यांनी अनेक स्टोरीज या एक्लुझिव्ह लिहिल्या आहेत. लोकमतसाठी मनोरंजन विभागात काम करताना बऱ्याच सेलिब्रिटीजचे इंटरव्यू घेतले. तसेच अनेक चित्रपटांचे रिव्ह्यू देखील केले आहेत. क्राईम बीटसाठी काम करताना स्टिंग ऑपरेशन केले आहेत.
– ईटीव्ही मराठीमध्ये एंटरटेनमेंट डेस्कसाठी कंटेन्ट एडिटर म्हणून काम केले आहे.
– महाराष्ट्र मीडिया पीआर कंपनीमध्ये VSTF या महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रोजेक्टसाठी काम केले. तसेच अनेक नामांकित ब्रँडसाठी कंटेन्ट रायटिंग केले आहे.
– ब्लूपॅड या अँपमध्ये अनेक विषयांवर 1000 हुन अधिक लेख लिहिले आहेत.
– एस्ट्रोटॉक या अँपमध्ये देखील कंटेन्ट रायटर या पदावर काम केले आहे. ज्योतिषीय विषयांवर अभ्यास व रिसर्च करून लेखन केले आहे.
– प्रियांका सध्या महाराष्ट्र टाईम्स.कॉमच्या एस्ट्रो रिलिजन सेक्शनसाठी कार्यरत आहे. येथे त्या ज्योतिष व धार्मिक विषयांवर स्वतःचे अनुभव, अभ्यास व रिसर्च करून लेख लिहितात.आणखी वाचा