Ambadas danve on sandipan bhumre: छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना (उबाठा) तर्फे हंबरडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चावर शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांनी टीका केली होती, या टीकेला अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज शिवसेना उबाठाने हंबरडा मोर्चाचं आयोजन केलं आहे. या पार्श्वभूमीवर शहरात मोठं शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने हा मोर्चा महत्वाचा मानला जातो आहे. सध्या उद्धव ठाकरे या मोर्चासाठी पोहोचले आहेत व त्यांच्यासह पक्षाचे मोठे नेतेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, शिंदेंच्या सेनेचे नेते व खासदार संदीपान भुमरे यांनी मात्र उद्धव ठाकरेंच्या या मोर्चावर टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
संदीपान भुमरेंचं वक्तव्य
उद्धव ठाकरेंचा हंबरडा मोर्चा हे राजकारण आहे, या शब्दात संदीपान भुमरेंनी टीका केली आहे. शेतकऱ्यांना मदत केली जात असतांनाही मोर्चा काढणे चुकीचे आहे, असं भुमरेंचं म्हणणं आहे. उद्धव ठाकरेंना शेतकरी माफ करणार नाहीत. असं ते म्हणाले आहेत. “शेतकऱ्यांना मदत जर झाली नसती तर मग उद्धव ठाकरेंनी मोर्चे काढले असते तर समजू शकलो असतो, पण जर समजा मदत करुन हा मोर्चा काढायचा, यामागे एकच कारण आहे ते म्हणजे राजकारण. पंचायत समिती, महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा मोर्चा काढला जात आहे.” PM Modi: सरकारचा बळीराजासाठी 42000 कोटींचा दिवाळी बोनस; शेतकऱ्यांसाठी खास योजनेची घोषणा; नेमकी स्किम काय?
अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर
भुमरेंच्या या टीकेला उबाठाचे नेते अंबादास दानवेंनी ट्वीट करत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी संदीपान भुमरेंच्या राजकीय प्रवासात उद्धव ठाकरेंचं सहकार्य किती राहिलं आहे, हेच अधोरेखीत केलं आहे. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे साहेबांवर टीका करताना संदीपान भुमरे यांनी हे ध्यानी घ्यावं की, ध्यानीमनी नसताना आपल्याला कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान देणारे उद्धव साहेब ठाकरे हेच होते.
गोविंदाची पत्नी सुनीता अहुजाने नवरात्रीनिमित्त कन्या पूजन कसं केलं?
‘कशाला अधिक बोलायला लावता?’
कोविडचे बलशाली संकट राज्यावर असताना उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडून आपल्या रोजगार हमी खात्याचा रुपयाही निधी कपात करण्यात आला नव्हता. २०१९ पर्यंत आपण जो निवडणूक उमेदवारी अर्ज भरून आमदार झालात, त्या फॉर्मवर उद्धव ठाकरे साहेबांचीच सही होती. आपले सुपुत्र जिल्हापरिषद सदस्य, सभापती झाले ते उद्धव साहेब ठाकरे यांच्याच पक्षाकडून झाले होते. आपला स्लीपबॉय ते मद्यविक्रीसम्राट हा प्रवास सर्वश्रुत आहे. कशाला अधिक बोलायला लावता? दानत आणि हिम्मत असेल तर सरकारला कर्जमुक्ती देण्यासाठी आपण भाग पाडाल! जे तुमच्या आवाक्याबाहेर आहे..
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा