Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 


Students Protest नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्त्वात दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचं नीट पेपरफुटीच्या मुद्यावर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरु आहे. देशभरातील आंदोलक विद्यार्थ्यांसोबत असल्याचं सांगण्यासाठी राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्व राजकीय पक्षांचे खासदार नवी दिल्लीतील गांधी स्मृतीस्थळावर पोहोचले. या स्थळावर पोहोचण्यापूर्वी राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.  

राहुल गांधी यांनी माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की आम्हाला इंडिया गेटवर जायचं होतं. विद्यार्थ्यांसोबत आहोत, असा मेसेज द्यायचा होता. मात्र, सरकारकडून त्याला परवानगी न मिळाल्यानं आम्ही गांधी स्मृती स्थळी जात आहोत. गांधी स्मृती स्थळावर जाण्यापूर्वी इंडिया आघाडीच्या खासदारांच्या बसेसना काही वेळ रोखण्यात आलं होतं. विद्यार्थी रस्त्यावर आहेत, त्यामुळं आम्ही रस्त्यावर आहोत हा मेसेज द्यायचं असल्याचं विरोधी पक्षांच्या खासदारांकडून सांगण्यात आलं. विरोधी पक्षांच्या खासदारांसोबत त्या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं दिसून आले. 

खासदार विशाल पाटील काय म्हणाले?

सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी आजच्या आंदोलनाबाबत माहिती दिली. भाजपच्या सरकारला, लोकांना सुबुद्धी द्यावी, अशी प्रार्थना केली. तरुण मुलं विद्यार्थी न्याय हक्कांसाठी भांडत आहेत. आता आम्हाला अडवलं, काल मारहाण झाली आम्ही सगळं सहन करु आम्ही राजकीय लोक आहोत आम्हाला सवय असते, असं विशाल पाटील म्हणाले. लहान लहान मुलं ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण नाहीत, अशा मुलांवर अत्याचार करणं, त्यांना मारणं हे स्ट्रॅटेजी करुन केलं जातं आहे.पोलीस, सीआरपीएफ नाही, होमगार्ड म्हणून वेगवेगळी लोकं आली, प्लेन ड्रेसमध्ये भाजप कार्यकर्ते आले. काठ्यांना खिळे ठोकून मारलं गेलं, आम्हाला मारताना कळलं. हा अन्याय झाल्यानं त्या मुलांचं भविष्यात काय होणार ही चिंता सामान्य नागरिकाला पडली आहे, असं विशाल पाटील म्हणाले.
   
काँग्रेस पक्ष म्हणून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्यानं पंतप्रधानांच्या घराबाहेर आंदोलन केलं. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय संसद चालणार नाही, असं विशाल पाटील म्हणाले.

दरम्यान, गांधी स्मृतीस्थळावर पोहोचण्यापूर्वी  राहुल गांधी यांच्या घरी इंडिया आघाडीची बैठक झाली. या बैठकीत विद्यार्थ्यासोबत असल्याचा मेसेज देण्यासाठी खासदार गांधी स्मृती स्थळाकडे रवाना झाले.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *