Shani Vakri 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनि देवाला (Shani Dev) न्यायदेवता आणि कर्मफळदाता म्हणतात. शनि प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. त्याच कारणामुळे शनि जेव्हा पण आपली चाल बदलतात तेव्हा त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर पाहायला मिळतो. द्रिक पंचांगानुसार, येत्या 27 जुलै 2026 रोजी शनि वक्री होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, शनिच्या वक्रीचा प्रभाव काही राशींवर (Zodiac Signs) होणार आहे. या राशी कोणत्या ते पाहूयात.
शनिच्या वक्रीने काय होईल नुकसान?
कामात अडथळा – तुमची ठरवलेली कामं अचानक रखडू शकतात. किंवा काही काळाने ती होऊ शकतात.
मानसिक तणाव – या कालावधीत तुम्हाला मानसिक ताणाचा सामना करावा लागू शकतो.
जुने विवाद – तुमचे आधीपासून कोर्ट-कचेरीत सुरु असलेले वाद पुन्हा सुरु होऊ शकतात.
‘या’ 5 राशींना सतर्कतेचा इशारा
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी काही जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. या कालावधीत कोणताही निर्णय घेताना घाईगडबड करु नका. तसेच, पैशांचा व्यवहार जपून करा.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांना पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये संतुलन ठेवण्याची गरज आहे. या काळात छोट्या छोट्या गोष्टींवरुन तुमचे वाद होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या.
तूळ रास (Libra Horoscope)
शनिच्या वक्री चालीमुळे तुमच्या खर्चात अचानक वाढ होऊ शकते. तसेच, कोणताही निर्णय घेताना नीट विचारपूर्वक घ्या. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीचा स्वामी ग्रह शनि आहे. त्यामुळे या कालावधीत तुमची कामं हळुवार गतीने पूर्ण होतील. तुमच्या स्वभाव चिडचिडेपणा येऊ शकतो. पैशांच्या बाबतीत फसवणूक होऊ शकते.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांना या काळात मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. जुने वादविवाद पुन्हा सुरु होऊ शकतात. तसेच, कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Dwidwadash Drushti Yog 2026 : आज जुळून येणार दुर्लभ द्विद्वादश योग; 4 राशींच्या पदरात पडणार पुण्य, सुवर्णकाळाचा अवधी अवघ्या काही तासांतच सुरु…