Pune Rain : राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे तर काही भागात अद्याप चांगला पाऊस पडताना दिसत आहे. राज्यात मुंबईसह पुणे कोकण या भागात चांगला पाऊस झाला आहे. धरणांच्या पाठीसाठ्यात देखील वाढ होत आहे. दरम्यान, अशातच पुणे जिल्ह्यासाठी आज हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन तासांत जिल्ह्यातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अनावश्यक प्रवास टाळावा तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं आहे. पुणे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता आणि आवश्यक सुविधा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.
पालघर जिल्ह्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस
पालघर जिल्ह्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह संध्याकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून ठीक ठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची पाळी निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टी भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा परिणाम पाहायला मिळत असून डहाणू शहरांमध्ये ठीक ठिकाणी पाणी शिरूर दुकानांमध्ये पाणी शिरला आहे. तर दुसरीकडे तलासरी भागामध्ये सुद्धा ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाले आहे. सध्या मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून चारोटी डहाणू कडे जाणारा रस्ता ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी भरल्यामुळे बंद झाला आहे तर वाणगाव चिंचणी रस्ता सुद्धा रस्त्यावर पाणी आल्यामुळे बंद झाला आहे. अनेक ठिकाणी पावसाचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाला असून जनजीवन विस्कळीत होण्याचे पाळी निर्माण झाले आहे.. तर पावसाचा प्रमाण वाढलं तर धामणी धरणाचे सुद्धा तीन दरवाजे उघडण्यात येणार आहेत सूर्या आणि वैतरणात नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
डहाणू आणि तलासरी तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
पालघर जिल्ह्यात आज सायंकाळपासून अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.तर ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर ही परिणाम झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने उद्यासाठी पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने उद्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर