‘उज्ज्वल भारताचा पाया…’, विद्यार्थी आंदोलनावर बोलला पहिला क्रिकेटर, युवराजची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट! | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

दिल्लीच्या जंतर-मंतर वर विद्यार्थी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर वेगवेगळ्या सेलिब्रिटी स्वत:ची भूमिका मांडत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग यानेही सोशल मीडियावर या आंदोलनासाठी पोस्ट केली आहे.

'उज्ज्वल भारताचा पाया...', विद्यार्थी आंदोलनावर बोलला पहिला क्रिकेटर, युवराजची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट!
‘उज्ज्वल भारताचा पाया…’, विद्यार्थी आंदोलनावर बोलला पहिला क्रिकेटर, युवराजची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट!

नवी दिल्ली : दिल्लीच्या जंतर-मंतर वर विद्यार्थी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर वेगवेगळ्या सेलिब्रिटी स्वत:ची भूमिका मांडत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग यानेही सोशल मीडियावर या आंदोलनासाठी पोस्ट केली आहे. या आंदोलनावर क्रिकेट विश्वातून आलेली पहिलीच प्रतिक्रिया आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या आंदोलनाबाबत वेगवेगळ्या रिएक्शन दिल्या आहेत. युवराज सिंग त्याच्या पोस्टमध्ये विद्यार्थी, मुलं, महिला आणि पुरुषांच्या हक्कांबाबत बोलला आहे. याशिवाय त्याने चर्चेतूनच भारताच्या भविष्याचे उपाय सापडू शकतील, असं युवराज म्हणाला आहे.

बुधवारी युवराज सिंगने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेयर केली आहे. ‘प्रत्येक मुलगा, विद्यार्थी, महिला आणि पुरुषांसाठी, तुम्हाला शांततेमध्ये शिकण्याचा, सुरक्षित पुढे जाण्याचा आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संधी मिळण्याचा हक्क आहे. तुमचं कल्याण हेच उज्ज्वल भारताचा पाया आहे. काळजी, संधी आणि आशा असलेला समाज बनवण्यासाठी एकत्र येऊ. चर्चा करूनच आपण भारताच्या भविष्यासाठी सामंजस्यपूर्ण तोडगा काढू शकतो’, असं युवराज त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला.

संसदेवर मोर्चाचं आव्हान, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोमवार 20 जुलैला कॉकरोच जनता पार्टीकडून संसदेपर्यंत मोर्चाचं आव्हान दिलं गेलं होतं. यासाठी हजारो आंदोलक सेंट्रल दिल्लीमध्ये जमले. याच दिवसापासून संसदेत पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. संसदेपर्यंत मोर्चा घेऊन जात असताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला, यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

दुसरीकडे सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू आहे. उपोषणाच्या 25 व्या दिवशी वांगचुक यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला. माझं 11 किलो वजन घटल्याचं सोनम वांगचुक म्हणाले. सोनम वांगचुक हे सध्या रुग्णालयात आहेत.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/

‘उज्ज्वल भारताचा पाया…’, विद्यार्थी आंदोलनावर बोलला पहिला क्रिकेटर, युवराजची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *