Nitesh Karale : नीट पेपरफुटी प्रकणावरुन (NEET paper leak case) दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradan) यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. या आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांनी विविध संघटनांनी पाठिंबा देण्यात आला आहे. दरम्यान, अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते नितेश कराळे (कराळे मास्तर) यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांना खडे बोल सुनावल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे काँग्रेसने पुरेसे लक्ष दिले नाही
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे काँग्रेसने पुरेसे लक्ष दिले नाही, असा आरोप नितेश कराळे यांनी केला. जनतेच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर एकत्रितपणे भूमिका घेण्याऐवजी आघाडीतील नेते एकमेकांनाच सुनावत असल्याचे या घटनेतून दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत नेमकं चाललं तरी काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याऐवजी प्रसिद्धी मिळवण्यावर भर दिला जातोय
काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान नितेश कराळे म्हणाले, की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे केवळ फोटोसेशनसाठी जातात असे ते म्हणाले. आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याऐवजी प्रसिद्धी मिळवण्यावर भर दिला जात असल्याचा दावा या व्हायरल व्हिडिओत करण्यात आला आहे. कराळे यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधी आणि काँग्रेसचे इतर वरिष्ठ नेते अशा महत्त्वाच्या आंदोलनांमध्ये प्रत्यक्ष नेतृत्व करताना दिसत नाहीत, असा दावा त्यांनी केला.
20 जुलै रोजी झालेल्या आंदोलनावेळी विरोधक कुठे होते?
नीट पेपरफुटीप्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीने 20 जुलै रोजी आयोजित केलेल्या चलो संसद मार्चमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला तसेच, अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनावेळी विरोधक कुठे होते? असा संतप्त सवाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि कराळे मास्तर प्रसिद्ध असणारे नितेश कराळे यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना विचारला. आंदोलनाच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळवून देण्यापेक्षा फक्त प्रसिद्धी मिळवण्यावरच भर असल्याचे कराळे मास्तर यावेळी म्हणाले. दरम्यान, नितेश कराळे मास्तर आणि माणिकराव ठाकरे यांच्यातील संवादाचा हा व्हिडीओ स्वत: कराळे यांनी प्रसिद्ध केला आहे.
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर