Last Updated:
विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निर्णय हा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार गटाला धक्का मानला जात आहे. तर खासदार प्रतिभा धानोरकर गटाची सरशी झाली
चंद्रपूर महापालिकेमध्ये काँग्रेस गटनेतेपदाच्या वादात उफाळून आला होता. काँग्रेसच्या मनपा नगरसेवकांच्या गटनेते पदाबाबत नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी वडेट्टीवार गटाच्या राजेश अडडूर यांना हटवून सुरेंद्र अडबाले यांची गटनेतेपदी निवड केली होती. पण, याच्याविरोधात वडेट्टीवार गटाने आक्षेप घेतला. पण, राजेश अडुर यांची गटनेते म्हणून झालेली नोंद रद्द करत बहुमताच्या आधारे निवड झालेल्या सुरेंद्र अडबाले यांची गटनेते म्हणून नोंद घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली निघाला आहे.
विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निर्णय हा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार गटाला धक्का मानला जात आहे. तर खासदार प्रतिभा धानोरकर गटाची सरशी झाली आहे. मी गटनेता झालो असलो तरी काँग्रेसच्या सर्व 27 नगरसेवकांना सोबत घेऊन मी लोकांच्या समस्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया सुरेंद्र अडबाले यांनी दिली आहे.
चंद्रपूर शहर महापालिकेच्या 66 नगरसेवकांपैकी काँग्रेसच्या पंजा चिन्हावर निवडून आलेल्या 27 नगरसेवकांनी मनपात सत्ता स्थापनेवेळी एकमताने राजेश अड्डूर यांना गटनेता निवडले होते. मनपाच्या नव्या सत्ता स्थापनेला काही महिनेच झाले असताना आता काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाला पुन्हा उसळी मिळाली. फेब्रुवारी महिन्यात चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेच्या वेळेस वडेट्टीवार गटाच्या अडडूर यांना गटनेता करण्यात आलं होतं. मात्र वडेट्टीवार गटाचे काही नगरसेवक नुकतेच खासदार धानोरकर गटात गेल्यानंतर अडडूर यांच्या हकालपट्टीसाठी बैठक घेण्यात आली होती. यानंतर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्याकडे 27 पैकी बहुमताच्या 16 नगरसेवकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहत सुरेंद्र अडबाले यांना गटनेता म्हणून निवडल्याचे निश्चित केले. त्यानुसार आयुक्तांनी हा निर्णय दिला होता. आता पुन्हा एकदा आयुक्तांनी निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे. या निर्णयामुळे वडेट्टीवार यांना जबर धक्का मानला जात आहे.
Chandrapur,Chandrapur,Maharashtra
एकीकडे राहुल गांधींनी सरकारला पकडलं कोंडीत, अन् महाराष्ट्रात काँग्रेस खासदार मॅडम यांनी आमदार साहेबांना पुन्हा हरवलं!
