भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न – Marathi News | Students attempt to attack and assault BJP MLA Vinay Bihari car


कॉकरोच जनता पार्टीचे जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. संसदेच्या परिसरात कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा पोहोचल्यानंतर परिस्थिती चिघळली. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे येत आहेत. अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या आंदोलकांची भेट घेतली. काल राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर आंदोलन केले. दिल्लीत पावसाळी अधिवेशन सुरू असताना आंदोलनामुळे संसद परिसरात मोठा बंदोबस्त आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातंय. यादरम्यानच बिहारची राजधानी पटना येथे धक्कादायक घटना घडली.

पटनात भाजपा आमदार विनय बिहारी यांना आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. बुधवारी 22 जुलै 2026 रोजी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. यावेळी आमदार बिहारी हे डाकबंगला क्रॉसिंगवरून जात होते. यावेळी काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या गाडीला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी गाडी न थांबवता पुढे नेली.

विद्यार्थ्यांचा रोष इतका जास्त होता की, काही विद्यार्थ्यांनी थेट गाडीवरच हल्ला केला. यावेळी मोठी घोषणाबाजीही विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. त्याला मारा… त्याला मारा असे म्हणताना विद्यार्थी दिसत आहेत. दिल्लीतील आंदोलनाचे खतपाणी पटनापर्यंत पोहोचले आहे. पटनामध्ये विद्यार्थ्यांकडून याच मुद्द्यात आंदोलन केले जात आहे.

विद्यार्थी आक्रमक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांकडून विद्यार्थ्यांना रोखण्यात आले. जमावाला पांगवण्यासाठी त्यांनी लाठीचार्ज केला. काही विद्यार्थी डाकबंगलापर्यंत पुढे जाण्यात यशस्वी झाले. भाजपा आमदाराला विद्यार्थ्यांकडून मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तिथेच त्यांनी आमदाराला घेरले. भाजपाच्या आमदाराला मारण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संसद भवनाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. संसदेवर मोर्चा होता, त्यादिवशी संसदेचे मुख्य गेटही बंद करण्यात आले. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची व्याप्ती वाढताना दिसत आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *