Team India : इंग्लंडविरुद्ध पराभव तरी रँकिंगमध्ये टीम इंडियाचंच राज्य, टॉप-5 मध्ये 3 भारतीय बॅट्समन! | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचा 2-1 ने पराभव झाला, पण तरीही आयसीसी वनडे क्रमवारीमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा कायम आहे.

इंग्लंडविरुद्ध पराभव तरी रँकिंगमध्ये टीम इंडियाचंच राज्य, टॉप-5 मध्ये 3 भारतीय बॅट्समन!
इंग्लंडविरुद्ध पराभव तरी रँकिंगमध्ये टीम इंडियाचंच राज्य, टॉप-5 मध्ये 3 भारतीय बॅट्समन!

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचा 2-1 ने पराभव झाला, पण तरीही आयसीसी वनडे क्रमवारीमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा कायम आहे. कर्णधार शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहित शर्मा जगातल्या टॉप-5 बॅट्समनच्या यादीत कायम आहेत, तर शुभमन गिल नंबर वनच्या खूर्चीपासून फक्त एक रेटिंग पॉईंट दूर आहे.

इंग्लंडविरुद्धच्या 3 वनडे मॅचच्या सीरिजमध्ये 188 रन बनवणाऱ्या गिलच्या खात्यात आता 801 पॉईंट्स आहेत तर पहिल्या क्रमांकावर न्यूझीलंडचा बॅटर डॅरेल मिचेल आहे, ज्याचे 802 पॉईंट्स आहेत. विराट कोहली 767 पॉईंट्ससह तिसऱ्या आणि रोहित शर्मा 758 पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे.

इंग्लंडचा दिग्गज खेळाडू जो रूट याने टीम इंडियाविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली. सीरिजमध्ये 249 रन केल्यामुळे रूटला प्लेयर ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं. यानंतर रूट 4 स्थान वर आठव्या क्रमांकावर आला आहे. तर बेन डकेटने 11 स्थानांची उडी घेऊन 19वा क्रमांक गाठला आहे. तर जेकब बेथल 5 स्थान वर 64व्या क्रमांकावर आला आहे.

कुलदीपला चान्स न मिळाल्याने फटका

भारताच्या टी-20 टीमचा कर्णधार श्रेयस अय्यर यालाही वनडे क्रमवारीमध्ये फायदा झाला आहे. श्रेयस अय्यर दोन स्थान वर 13व्या क्रमांकावर आला आहे. बॉलिंगमध्ये टीम इंडियाचा स्टार स्पिनर कुलदीप यादवचं नुकसान झालं आहे. कुलदीप टॉप-10 बॉलरमधून बाहेर झाला असून आता तो 11व्या क्रमांकावर आहे. बॉलरच्या यादीत अफगाणिस्तानचा राशिद खान पहिल्या क्रमांकावर आहे.

इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर याने भारताविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये 5 विकेट घेतल्या यानंतर तो एक स्थान वर तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा स्पिनर अबरार अहमद आहे.

टीम इंडिया नंबर वन

तर टीमच्या क्रमवारीमध्ये टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर न्यूझीलंड दुसऱ्या, ऑस्ट्रेलिया तिसऱ्या, दक्षिण आफ्रिका चौथ्या, पाकिस्तान पाचव्या, श्रीलंका सहाव्या, इंग्लंड सातव्या, अफगाणिस्तान आठव्या, बांगलादेश नवव्या आणि वेस्ट इंडिज दहाव्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीमुळे वेस्ट इंडिजला पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपसाठी थेट क्वालिफाय व्हायची शक्यता कमी आहे. वनडे वर्ल्ड कप खेळण्यासाठी वेस्ट इंडिजला क्वालिफायर राऊंड खेळावे लागू शकतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *