जंतर मंतरवर नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन केले जात आहे. काल शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांची भेट घेतली. आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला शरद पवार पोहोचले. यावेळी सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे स्वागत केले. मराठा समाजाचे नेते आंदोलन मनोज जरांगे पाटील दिल्ली दाैऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेतली. सरकारला मोठा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, शांततेच्या आंदोलनात ताकद आहे, हे आम्ही सिद्ध करून दाखवले आहे. आम्ही सुद्धा तुमच्यासोबत आहोत. जागा फक्त सोडू नका, त्यांना आपण निवडून दिलेले आहे. आपण आपल्या मायबापांनी यांना मतदान केले. आपल्या गावकऱ्यांनी यांना मतदान केले.
आपल्या जिल्ह्यांने तालुक्याने यांना मतदान केले. पण आज हेच आपल्या विद्यार्थ्यांवरती लेकरा बाळांवरती उलटले आहेत. यांना उलटे करण्याची ताकद या विद्यार्थ्यांमध्ये आणि राज्यातील गोरगरीब जनतेत आहे, हे यांच्या लक्षात नाहीये. जर या पुढच्या काळात तुम्हाला जर कुठे धक्का लागला तर आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. सर्व देश, राज्य तुमच्यासोबत आहे, एवढ्याच शब्द देतो.
इथे जे पोरं बसले आहेत, त्यांची तळमळ आहे. पण एखाद्या निर्णयामुळे त्यांची तळमळ मोडू नये. शांततेत राहिले तर न्याय मिळतो. जंतर मंतरची जागा ही आंदोलनाची जागा आहे, त्यामुळे इथे ते काही करू शकत नाहीत, त्यामुळे आंदोलकांनी ही जागा सोडून नये. जर इथे येऊन त्यांनी काही केले तर त्यांना आपल्या गावात फिरता येणार नाही, आपल्या जिल्ह्यात फिरता येणार नाही.
पुन्हा जर लाठीचार्ज केला तर महाराष्ट्रात यांना फिरू देणार नाही, असा मोठा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनाचे समर्थन केले. काल दुपारी या आंदोलकांना भेटण्यासाठी जंतर मंतरवर शिवसेना नेते संजय राऊतही पोहोचले होते. विरोधकांनी हे आंदोलन आपल्या हातात घ्यावे, असे आवाहन राऊतांनी केले होते.