धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा.. – Marathi News | Read the 5 key reasons why Union Education Minister Dharmendra Pradhan is not being asked to resign


जंतर मंतरवर सध्या कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला जगभरातून समर्थन मिळतंय. संसदेच्या दिशेने मोर्चा नेल्याने आंदोलन चिघळले. नीट पेपटफुटीच्या मुद्द्यात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. आंदोलक धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. काल अनेक राजकीय नेत्यांनी आंदोलकांच्या भेटी घेतल्या. CJP ने संसदेवर मोर्चा काढूनही धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतील असे कोणतेही संकेत दिसत नाहीत. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या निदर्शनांनंतरही सरकार फारसे चिंतेत का दिसत नाही, यासोबतच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नक्की का घेतला जात नाही? असे प्रश्न उपस्थित केली जात आहेत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्याची प्रमुख 5 कारणे आहेत, ही कारणे नक्की कोणती याबद्दल जाणून घेऊयात.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून धर्मेंद्र प्रधान सरकारमध्ये आहेत. सलग कार्यरत असलेल्या मंत्र्यांपैकी ते एक आहेत.  गृहमंत्री अमित शाह आणि एस. जयशंकर हे या 7 नेत्यांनंतर मोदी सरकारमध्ये सामील झाले. धर्मेंद्र प्रधान यांनी आतापर्यंत अनेक महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. ते नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. धर्मेंद्र प्रधान हे ओडिसाचे आहेत.

धर्मेंद्र प्रधान 12 वर्षांपासून मंत्री

चला जाणून घेऊयात कोणत्या कोणत्या खात्यांची जबाबदारी धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे होती

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री-2014 ते 2021
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री- 2017 ते 2024
पोलाद मंत्री- 2021
शिक्षण मंत्री- 2021 ते आजपर्यंत.

धर्मेंद्र प्रधान अजून काही काळ शिक्षणमंत्री म्हणून राहिले तर ते डॉक्टर मुरली मनोहर जोशी यांचा रेकॉर्ड मोडतील. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मुरली मनोहर जोशी यांनी 6 वर्ष 2 महिने केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणून काम बघितले. आता धर्मेंद्र प्रधान काही दिवसातच तो विक्रम मोडतील.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्याची मुख्य 5 कारणे खालीलप्रमाणे

नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन सुरू केले. 22 दिवसांपेक्षा अधिक काळापासून आंदोलन सुरू आहे. अजूनही आंदोलक राजीनाम्यावर ठाम आहेत. मात्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे कोणतेही संकेत मिळत नाहीत. त्याचे महत्वाचे पहिले कारण म्हणजे कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात उत्साह अधिक दिसतो, विश्वासार्हतेपेक्षा. सरकारच्या माहितीनुसार, या आंदोलनामध्ये त्यांचे कोणतेही राजकीय नुकसान होणार नाही.

सध्या देशाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मुळात म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणत्याही निडणुका तोंडावर नाहीत. नरेंद्र मोदी सरकारमधील मंत्र्याच्या कामगिरीवर पंतप्रधान कार्यालयाची बारीक नजर कायम असते. जर धर्मेंद्र प्रधान यांचे काम चांगले नसते तर त्यांना सलग 12 वर्ष केंद्रीय मंत्री म्हणून राहण्याची संधी मिळाली नसती. कॉकरोच जनता पार्टीच्या मागण्या या कोणत्याही ठोस पुराव्याच्या आधारावर नसल्याचे सरकारला वाटते.

कॉकरोच जनता पार्टी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. मात्र, कोणताही पर्याय सुचवण्यास अपयशी ठरत आहेत. 20 जुलै रोजी त्यांनी पहिल्यांदाच जे.पी. नड्डा यांना लेखी निवेदन सादर केले होते. धर्मेंद्र प्रधान यांनी याच महिन्यात केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. या दरम्यान थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यामुळे दिल्लीत एक वेगळे वातावरण बघायला मिळतंय.

या आंदोलनामुळे पावसाळी अधिवेशन संसदेत चालू शकत नाहीये. संसदेचे कामकाज बंद करण्यात आले. शिवाय मोठा बंदोबस्त संसद परिसरात आहे. पाचवा आणि यातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे धर्मेंद्र प्रधान गेल्या अनेक वर्षांपासून भाजपासोबत जोडले गेले आहेत. त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून देखील काम केले. ABVP च्या माध्यमातून त्यांनी भाजपात प्रवेश केला.

जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील ही पहिलीच वेळ असेल की, विरोधकांच्या दबावानंतर राजीनामा द्यायची वेळ येईल. ज्यामुळे विरोधी पक्ष वारंवार अशाप्रकारची मागणी करू शकतात. जंतर मंतरवरील आंदोलनाचे काही व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत, ज्यातून पोलीस आंदोलकांना मारहाण करताना दिसत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *