अरे सोड रे शिंदे शिंदे काय चाललंय? शिंदे म्हणजे काय राममनोहर लोहिया आहेत का? की नेहरू आहेत? संजय राऊत संतापले – Marathi News | Sanjay Raut Attacks Eknath Shinde After MP Merger Approval Is Shinde Nehru or Ram Manohar Lohia


शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाला मोठा धक्का बसला आहे. काल उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून बंडखोरी केलेल्या सहा खासदाराच्या विलीनीकरणाला लोकसभा सचिवालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यांनी थेट शिंदे म्हणजे काय राममनोहर लोहिया आहेत का? की नेहरू आहेत? असे म्हटले आहे.

“शिंदे म्हणजे काय राम मनोहर लोहिया आहेत का?”

संजय राऊत म्हणाले, अरे सोड रे शिंदे शिंदे काय चाललंय. तुला काय वाटतं शिंदे म्हणजे काय राम मनोहर लोहिया आहेत का? काय शिंदे शिंदे चाललंय? कोण आहेत ते? पंडित नेहरू आहेत का, जय प्रकाश नारायण आहेत का? आचार्य कृपलानी आहेत का? वसंतराव नाईक आहेत का? वसंतदादा पाटील आहेत का? बंद करा हे नुकसान करताय तुम्ही महाराष्ट्राचं. टीएमसी विकत घेतली. आप विकत घेतली. शिवसेना विकत घेतली. त्या पक्षाची ती बैठक आहे.

“देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे”

पुढे ते म्हणाले, सुप्रीम कोर्ट गुलाम आहे. ४० आमदारांचा कोर्टाने निर्णय दिला नाही. हा निर्णय दिला असता तर वारंवार पक्ष फुटले नसते. संविधान आहे कुठे. संविधानाच्या १० व्या शेड्युलमध्ये काय म्हटलंय. कुठल्याही फुटीला आणि विलिनीकरणाला मान्यता नाही. लोकसभा अध्यक्षांनी कोणत्या कायद्याने मान्यता दिली. कोणता कायदा आहे. संविधानात कोणता अनुच्छेद आहे. देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे. हे लोक आधी कायद्याचा मर्डर करत आहेत. हे लोक सीरियल रेपिस्ट आणि सीरियल किलर आहेत. या लोकांना सोनम वांगचुक आणि अभिजीत दीपकेला मारायचं आहे.

बंडखोरी केलेल्या सहा खासदारांविषयी बोलताना ते म्हणाले, सहा खासदार निर्लज्ज आहेत. गद्दार शब्दही कमी पडेल. हा लोकशाहीवरचा बलात्कार करून खून, गुन्हे घडतात ना, तसा हा रेप अँड मर्डर आहे लोकशाहीवरचा. हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. हे जे आहे सीरियल रेपिस्ट आणि सीरियल किलरही आहे लोकशाहीचे. ५० -५० कोटीला लोकं विकत घेत आहेत. लोकांना खायला मिळत नाही. लोक उपोषणाला बसले आहेत. यू आर सीरियल रेपिस्ट अँड सीरियल किलर आहात लोकशाहीचे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *