Shreyas Iyer Sister Shreshta Iyer Controversy: सर्व मर्यादा ओलांडल्या, मला अश्लील भाषेत…; श्रेयस अय्यरची बहीण संतापली, व्हिडीओद्वारे सगळं सांगितलं


Shreyas Iyer Sister Shreshta Iyer Controversy: पंजाब किंग्स (PBKS) आयपीएल 2026 च्या स्पर्धेतून (IPL 2026) बाहेर पडल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याची बहीण श्रेष्ठा अय्यर (Shreshta Iyer) हिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. सोशल मीडियावरील या ट्रोलिंगनंतर श्रेष्ठा अय्यर हिने व्हिडीओ पोस्ट करत या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. (Shreyas Iyer Sister Shreshta Iyer Controversy)

श्रेष्ठा अय्यर म्हणाली, लोक म्हणत आहेत, माझ्याकडे आता बोलायला काहीच नाही? माझ्याकडे बोलायला खूप काही आहे. यावर ट्रोलिंगपासून सुरुवात करूया. मी बनवलेल्या व्हिडीओबद्दल तुम्ही एका छोट्या गोष्टीला खूप मोठे स्वरूप दिले. तुम्हाला वाटते की तो एक ट्रोलिंग व्हिडीओ होता, पण मला वाटले की ती एक गंमतीशीर थट्टा होती. यामागे माझा कोणताही वाईट हेतू नव्हता. मी फक्त माझ्या भावाच्या संघाला पाठिंबा देत होते. याचा अर्थ असा नाही की मी कोणत्याही संघाचा किंवा खेळाडूंचा द्वेष करते. उलट, मी सर्व खेळाडूंचा आदर करते कारण माझा भाऊसुद्धा एक क्रिकेटपटू आहे, असं श्रेष्ठा अय्यर म्हणाली. तसेच श्रेष्ठाने सोशल मीडियावर तिला अपमानास्पद मेसेज पाठवणाऱ्या नेटकऱ्यांवर देखील जोरदार टीका केली.

सर्व मर्यादा ओलांडल्या- श्रेष्ठा अय्यर (Shreyas Iyer Sister Shreshta Iyer Controversy)

श्रेष्ठा पुढे म्हणाली, “मी इथे त्या चाहत्यांबद्दल बोलायला आले आहे जे बेरोजगार, निराश आणि कामाशिवाय आहेत. माझ्या त्या व्हिडीओनंतर तुम्ही माझ्या कमेंट्स सेक्शनमध्ये गेलात तर, तिथे किती वाईट कमेंट्स आहेत हे तुम्हाला दिसेल. असे अनेक लोक आहेत जे बेरोजगार आणि निराश आहेत. मला त्यांची खरंच खूप दया येते. मला माझ्या कामाच्या ठिकाणी लोक तिला फोन करून अश्लील भाषेत बोलत आहेत आणि माझा अपमान करत आहेत. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते, आणि त्या लोकांनी त्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असं श्रेष्ठा अय्यर म्हणाली. 

नेमकं प्रकरण काय? (Shreyas Iyer Sister Shreshta Iyer Controversy)

खरंतर, 6 एप्रिल रोजी झालेला केकेआर विरुद्ध पंबाज किंग्सचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. पंजाब किंग्स संघ तेव्हा एकही सामना हरला नव्हता, आणि कोलकाता नाईट रायडर्स त्यांच्या पहिल्या विजयाच्या शोधात होते, परंतु सामना रद्द झाल्यामुळे त्यांना त्यांचा पहिला गुण देण्यात आला. त्यानंतर श्रेयस अय्यरची बहीण, श्रेष्ठा अय्यरने, “पंजाबी लोकांचे मन मोठे असते, हा तुझ्यासाठी एक गुण,” असे म्हणत एक गंमतीशीर व्हिडीओ बनवला. या व्हिडीओवरुन श्रेष्ठा केकेआर संघाची खिल्ली उडवत आहे, असा चाहत्यांनी अर्थ लावला. या वादात तिला ट्रोलर्सकडून ऑनलाइन धमक्या मिळाल्या, ज्यामुळे तिने नंतर तो व्हिडीओ हटवला आणि यावर स्पष्टीकरण दिले. अखेरीस कोलकाताने सलग सामने जिंकले, तर पंजाब किंग्सने सलग सहा सामने गमावले. एका क्षणी, 13 सामन्यांनंतर दोन्ही संघ प्रत्येकी 13 गुणांवर बरोबरीत होते.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

ही बातमीही वाचा:

RCB vs GT Qualifier 1: पावसामुळं क्वालिफायर-1 रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण? बंगळुरु की गुजरात, जाणून घ्या IPL चा नियम 

आणखी वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *