IND vs ENG: कर्णधार गिलने ज्याच्यावर विश्वास टाकला त्यानेच केला घात, लॉर्ड्स सामन्यात कोण ठरला व्हिलन? – Marathi News | Shubman gill favourite player reason for team india lost odi series against england


भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिका पार पडली. भारतीय संघाने ही मालिका गमावली. टी-20 मालिकानंतर आता वनडे मालिका गमावावी लागली. या सामन्यात भारतीय संघाचा अर्धा संघ बदलावा लागला, अनेक दुखापतग्रस्त खेळाडू शेवटच्या सामन्यापूर्वी संघाच्या बाहेर पडले. अनेक बदलांचा परिणाम शेवटी भारतीय संघाला मालिका गमवावी लागली. आता या लॉर्ड्सच्या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने त्याच्या लाडक्या खेळाडूवर भरोसा दाखवला पण तो त्यावर पूर्णपणे खरा उतरलेला नाही. ज्याच्याकडून गिलला खूप अपेक्षा होती त्या गुजरतच्या खेळाडूनेच घात केला.

भारतीय वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने एक नकोसा विक्रम रचला आहे. रविवारी इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ब्रारने 10 षटके गोलंदाजी केली आणि 97 धावा दिल्या. त्याला एकही बळी मिळाला नाही. यामुळे तो एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा देणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. या नकोस्या यादीत भुवनेश्वर कुमार अव्वल स्थानी आहे, ज्याने 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 10 षटकांत 106 धावा देऊन केवळ एक बळी घेतला होता. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या विनय कुमारने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 षटकांत 102 धावा देऊन केवळ एक बळी घेतला होता. भुवी या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे, त्याने 2017 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 91 धावा देऊन एक बळी घेतला होता.

रविवारी खेळल्या गेलेल्या निर्णायक सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून निर्धारित षटकांत तीन गडी गमावून 387 धावा केल्या. लॉर्ड्सवरील ही आतापर्यंतची सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या आहे. बेन डकेट आणि जेकब बेथेल या सलामीच्या जोडीने यजमानांना चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी 181 चेंडूंमध्ये पहिल्या विकेटसाठी 192 धावांची भागीदारी केली. बेथेल 93 चेंडूंमध्ये 13 चौकारांसह 91 धावा करून बाद झाला. त्यानंतर डकेटने जो रूटसोबत दुसऱ्या विकेटसाठी 80 चेंडूंमध्ये 101 धावांची भागीदारी करून संघाला 293 धावांपर्यंत पोहोचवले. डकेटने 135 चेंडूंमध्ये 1 षटकार आणि 18 चौकारांसह 141 धावा केल्या.

कर्णधार हॅरी ब्रूक चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला, पण तो जो रूटसोबत तिसऱ्या विकेटसाठी केवळ 31 धावाच करू शकला. ब्रूक अवघ्या 14 धावांवर बाद झाला, त्यानंतर जोस बटलरने रूटसोबत 19 चेंडूंमध्ये नाबाद 63 धावांची भागीदारी करून संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. रूट 48 चेंडूंमध्ये 9 चौकारांसह 74 धावांवर नाबाद राहिला.

दरम्यान, बटलर 13 चेंडूंमध्ये 7 चौकारांसह 41 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने 69 धावांत 2 बळी घेतले, तर प्रिन्स यादवने 79 धावांत 1 बळी घेतला. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 6 गडी राखून जिंकल्यानंतर, भारतीय संघाने दुसरा सामना 4 गडी राखून गमावला. त्यामुळे, मालिकेतील तिसरा सामना निर्णायक ठरला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *