Sonia Gandhi नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी काँग्रेस खासदारांसह नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. सव्वा तीन तासांनंतर राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दिल्ली पोलिसांनी प्रियांका गांधी यांना मंदिरमार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर दोन तासानंतर सोनिया गांधी मंदिरमार्ग पोलीस स्टेशनला पोहोचल्या आहेत. दुपारी साडेतीन वाजल्यापासून पंतप्रधान निवासस्थानाबाहेर राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह ठिय्या आंदोलन केलं होतं. तीन तासानंतर पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना ताब्यात घेण्यात आलं.
सोनिया गांधी मंदिरमार्ग पोलीस स्टेशनला पोहोचल्या
खासदार प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेस खासदारांना नवी दिल्लीतील मंदिरमार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्या प्रकरणी काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. काँग्रेस नेत्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर दोन तासांचा कालावधी झाल्यानंतर सोनिया गांधी मंदिरमार्ग पोलीस ठाण्यात पोहोचल्या आहेत. सोनिया गांधी मंदिरमार्ग पोलीस स्टेशनसमोर पोहोचल्या आहेत. राहुल गांधी यांना छत्रसाल स्टेडियममध्ये ठेवण्यात आलं आहे. राहुल गांधी यांच्या नाकाला दुखापत झाल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. त्यामुळं सोनिया गांधी मंदिरमार्ग पोलीस ठाण्यबाहेर पोहोचल्या आहेत.
सोनिया गांधी मंदिरमार्ग पोलीस स्टेशनच्या बाहेर पोहोचल्या असल्या तरी त्यांना आत प्रवेश मिळालेला नाही. मंदीर मार्ग पोलीस स्टेशनच्या गेटवर त्या चर्चा करत असल्याचं पाहायला मिळालं. या पोलीस स्टेशनमध्ये प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसचे इतर खासदार आहेत.
सचिन पायलट काय म्हणाले?
पोलिसांकडून लाठीमार होणे, विद्यार्थ्यांना जखमी करणे हे कोणाला मान्य नाही. देशाच्या विरोधी पक्षनेत्यांना जबरदस्ती उचलण्यात आलं. लोककल्याणासाठी राहुल गांधी ठिय्या आंदोलन करत होते. केंद्र सरकारनं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता. नीटच्या मुद्यावर संसदेत चर्चा झाली पाहिजे. संपूर्ण भारत देश नीटच्या मुद्यावर विद्यार्थ्यांसोबत आहे,असं काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले.
शांततेमध्ये आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आम्हाला अटक केली तसेच राहुल गांधी यांना सुद्धा बळजबरीने उचलून नेले, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आता काँग्रेस स्वस्थ बसणार नाही असा इशारा काँग्रेसचे अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी दिला.
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं