IND vs ZIM : लढाई एकतर्फी होणार नाही, सलग दोन देशांविरुद्ध पराभवाचं तोंड पाहणाऱ्या टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा म्हणाला…


नवी दिल्ली : टीम इंडियाच्या टी 20 संघाला आयर्लंड आणि इंग्लंड विरोधातील मालिकांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. याशिवाय इंग्लंडनं भारताला वनडे मालिकेत 2-1 असं पराभूत केलं. टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर या दोन संघांविरोधातील मालिकेत पराभव स्वीकारावा लागला आहे. या मालिकेतील पराभवातून सावरण्यापूर्वीच टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन  सामन्यांची टी 20 मालिका 23 जुलै पासून सुरु होत आहे. या सामन्यापूर्वीच झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा यानं भारताला आव्हान दिलं आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील मालिका एकतर्फी होणार नाही, असा थेट इशाराच सिकंदर रझा यानं दिला आहे. भारतासाठी दोन मालिकेतील पराभवानंतर झिम्बाब्वे विरोधातील मालिका महत्त्वाची आहे.

झिम्बाब्वेच्या कॅप्टनचं भारताला चॅलेंज 

सिकंदर रझानं स्टार स्पोर्टससोबत बोलताना म्हटलं की या मालिकेत दोन्ही देशांकडे मालिका जिंकण्याची समान संधी आहे. झिम्बाब्वे सातत्यानं रोमांचक क्रिकेट खेळत आहे, त्यामुळं निश्चिंत आहे, असं रझा म्हणाला. ही मालिका मनोरंजक असेल, मला वाटतं जय आणि पराजयाचा विषय आहे जो दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही देशांसाठी मालिका जिंकण्याची समान संधी असेल, असं सिकंदर रझा यानं म्हटलं. 

सिकंदर रझानं म्हटलं की मला वाटतं भारताप्रमाणं झिम्बाब्वे देखील स्थित्यंतरातून जात आहे, त्यामुळं ही मालिका एकतर्फी नसेल, असं वाटत असल्याचं सिकंदर रझा म्हणाला.  

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील भारतीय संघासाठी झिम्बाब्वेचा दौरा महत्त्वाचा आहे. कारण श्रेयस अय्यरसाठी झिम्बाब्वेचा दौरा मोठं आव्हान आहे. श्रेयस अय्यरला टी 20 संघाचं कर्णधार केल्यानंतर भारताला आयर्लंड आणि इंग्लंड विरोधातील मालिकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळं श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडिया पहिल्या मालिका विजयाच्या प्रतीक्षेत आहे. अय्यरच्या नेतृत्वात भारताला आतापर्यंत टी 20 मध्ये मालिकेत विजय मिळाला नाही.  

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी मालिका 23 जुलै, 25 जुलै आणि 26 जुलै रोजी होतील. सर्व सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार साडे चार वाजता सुरु होतील. हे सर्व सामने हरारे स्पोट्स क्लब हरारेमध्ये होणार आहेत.  

झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, अशोक शर्मा, यश ठाकूर, मयांक यादव, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर).

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *