प्रत्येक एलपीजी गॅस सिलिंडवर 500 रुपये परत, या ग्राहकांना बंपर जॅकपॉट, काय आहे स्कीम? – Marathi News | 500 cashback on every LPG gas cylinder a bumper jackpot for these customers what is the scheme


अनेक ग्राहक हे घरगुती वापरासाठी 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरचीच खरेदी करतात. मात्र देशात असा देखील एक ग्राहक वर्ग आहे, जे पाच किलोच्या एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर करतात. जे लोक किरायाने राहतात किंवा विद्यार्थी आहेत, ज्यांच्याकडे एलपीजी गॅसचं अधिकृत कनेक्शन नाही अशा लोकांसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. अशाच ग्राहकांसाठी इंडियन ऑयलने हा पाच किलो एलपीजी गॅस सिलिंडरचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. हा गॅस सिलिंडर छोटू नावाने देखील ओळखला जातो. या गॅस सिलिंडरचं वैशिष्ट म्हणजे या गॅससाठी कोणतंही कनेक्शन लागत नाही, त्यामुळे हा गॅस सिलिंडर कुठेही सहज उपलब्ध होऊ शकतो. पाचशे रुपयांमध्ये तुम्ही हा गॅस सिलिंडर घरी आणू शकतात.

दरम्यान इंडियन ऑइलने छोटू नावाने हा पाच किलोग्रॅमचा एलपीजी गॅस सिलिंडर लाँच केला होता. हा पाच किलोग्रॅमचा गॅस सिलिंडर लाँच करण्यामागे लॉजिकच हे होतं की, जे लोक किरायाने राहतात ज्यांच्याकडे कायम स्वरुपी कुठलाही पत्ता नाहीये, किंवा जे विद्यार्थी आहेत, त्यांना तो फायद्याचा ठरावा, कारण या एलपीजी गॅस सिलिंडरच्या खरेदीसाठी कुठल्याही अधिकृत गॅस कनेक्शनची आवश्यकता नसते. ग्राहक आपल्या सोईनुसार कोणत्याही शहरात या गॅसचा वापर करू शकतात. जर एखाद्या ग्राहकाला भविष्यात या एलपीजी सिलिंडरची गरज नसेल तर तो या गॅसच्या अधिकृत विक्री केंद्रावर जाऊन हा गॅस सिलिंडर परत करू शकतो. ग्राहकांना अशा प्रत्येक पाच किलोच्या सिलिंडवर 500 रुपये वापस मिळतात.

हा एलपीजी गॅस सिलिंडर खरेदी करण्यासाठी कोणत्याही अधिकृत गॅस कनेक्शनची गरज नाही, ग्राहक केवळ आपलं ओळख पत्र दाखवून एलपीजी गॅस सिलिंडरच्या अधिकृत वीक्री केंद्रातून हा पाच किलोचा छोटू गॅस सिलिंडर घरी आणू शकतात. त्यानंतर समजा त्या ग्राहकाची दुसऱ्या शहरात बदली झाली तर तो पुन्हा हे गॅस सिलिंडर अधिकृत विक्री केंद्रात परत करू शकतो, त्याबदल्यात त्याला सरकार 500 रुपये देतं. तो दुसऱ्या शहरातही अशा पद्धतीने या सिलिंडरची खरेदी करू शकतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *