Cockroach janta party protest Supports Bollywood: सोमवारी ‘कॉकरोच जनता पार्टी’कडून (Cockroack janta party) ‘संसद चलो’ (Sansad Chalo) हा मोर्चा खास तरुण वर्गाकडून काढण्यात आला. नीट पेपर फुटी प्रकरण, शिक्षण व्यवस्थेतील भोंगळ कारभाराविरोधात (Bollywood Celebrity) भारतभर देशीतील तरुणांनी आवाज उठवला. या आंदोलनात दिग्गज कलाकारांची हजेरी पाहायला मिळाली. तर, काही कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चाला पाठिंबा दिला. या आंदोलनात पोलिसांचं उग्र रुप पाहायला मिळालं. पोलिसांनी काही ठिकाणी लाठी चार्ज केलं. या आंदोलनात काही तरुण प्रचंड प्रमाणात जखमी झाले. तर, काही तरुण रक्तबंबाळ झाले. याचे व्हिडीओही सोशल मीडियात प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले. दरम्यान, याच विरोधात हुमा कुरेशी ते अनुराग कश्यप यांनी आवाज उठवला आहे.
हुमा कुरैशीने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच लाठी चार्जचा विरोध दर्शवला. ‘आजची दृश्ये माझ्या मनात दीर्घकाळ राहिल. शांततापूर्ण आंदोलनकर्त्यांना इतक्या क्रूर पद्धतीने मारण्यात आलं. हे सगळं पाहून मला प्रचंड दु:ख झालं. हे प्रकरण सयंम, लोकांचे म्हणणे ऐकून आणि संवाद साधून हाताळता आलं असतं’, असं हुमा म्हणाली. ‘आपण भारतीयांनी हे सरकार निवडलं आहे. आज आपण सर्वांना प्रश्न उपस्थित करणं गरजेचं आहे. आपला देश खूप मोठा आणि विविधतेने परिपूर्ण आहे. गरजेचं नाही की आपण प्रत्येक जण प्रत्येक गोष्टींशी सहमत असू… पण या गोष्टीशी सहमत असू की बळाचा वापर करण्यापूर्वी नागरिकांचे म्हणणे आदरपूर्वक ऐकून घेणे गरजेचं आहे’, असं हुमा म्हणाली.
अनुराग कश्यपने पोलिसांवर उठवला प्रश्न
फिल्ममेकर अनुराग कश्यपने पोलिसांच्या कारवाईवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ‘वर्दी घालण्यासाठी, आपला आत्मा, आपली जवळीक सगळ्याचा त्याग करावा लागतो. या देशात असा एक तरी पोलीस आहे का? जो ठामपणे उभा राहून म्हणू शकेल की, ‘मी हा आदेश पाळणार नाही, कारण तो चुकीचा आहे?’, असं म्हणत अनुराग कश्यपने पोलिसांसमोर तिखट शब्दांत प्रश्न उपस्थित केला आहे.
विशाल ददलानीचीही पोस्ट व्हायरल
विशाल ददलानी यानेही पोलीस कारवाईवर टीका केली आहे. त्याने पोस्टमध्ये म्हटलं की, ‘तुम्ही पाहिलं का? मंदिरात, मत, कागदपत्रांमध्ये चोरी. जेव्हा मुलं आवाज उठवतात तर, स्वतःची चूक न मानता उलट समोरच्यावरच रुबाब दाखवता? अर्थव्यवस्थेपासून ते शिक्षण व्यवस्थेपर्यंत या गुंडांची कमजोरी सर्वत्र स्पष्टपणे दिसून येते’, असं विशाल ददलानी आपल्या पोस्टमध्ये म्हणाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या: